कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:03 AM2019-06-25T11:03:19+5:302019-06-25T11:06:11+5:30

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील ...

Kolhapur Zilla Parishad honors Delhi | कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान

नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभामध्ये स्वच्छता व पेयजल विभागाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेतील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक कोल्हापूर जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आले. अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हे पारितोषिक स्वीकारले.

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धे’तील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान

कोल्हापूर : ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेत कोल्हापूरजिल्हा परिषदेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक सोमवारी प्रदान करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित स्वच्छता महोत्सवामध्ये अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हे पारितोषिक स्वीकारले.

स्वच्छता व पेयजल विभागाचे केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, सचिव परमेश्वर आयर, अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या पेयजल स्वच्छता मंत्रालयाकडून १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात पहिला, तर भारत देशात दुसरा क्रमांक पटकाविला.

वैयक्तिक तसेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत क्षेत्रांतील सार्वजनिक शौचालय रंगविण्याच्या या व्यापक मोहिमेमध्ये सर्व स्तरावरील लोकसहभाग व शासकीय यंत्रणांचे योगदान मिळावे यासाठी दिनांक २८ जानेवारी २०१९ हा दिवस ‘एक दिवस शौचालयासाठी’ म्हणून घोषित करण्यात आला होता. यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यात एकूण ४,३१,५८४ इतकी वैयक्तिक शौचालये रंगविण्यात आली. तसेच ८,४१९ इतकी सार्वजनिक शौचालय, शाळा व अंगणवाडी शौचालये रंगविण्यात आली.

या कार्यक्रमाला पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, सावर्डेच्या सरपंच सुवर्णा कारंडे, पेंढाखळेच्या सरपंच सुनीता पाटील, स्वच्छाग्रही सिद्दाप्पा करगार (गडहिंग्लज), रोहित भंडारी (राधानगरी) हे उपस्थित होते.

 

Web Title: Kolhapur Zilla Parishad honors Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.