कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर, कही खुशी..कही गम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:36 AM2022-07-28T11:36:13+5:302022-07-28T17:44:24+5:30
पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे.
कोल्हापूर: जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेसाठीकोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर तर, बाराही पंचायत समित्यांसाठी तालुका पातळीवर आरक्षण सोडत प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा परिषदेसाठी १० मतदार संघाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सिध्दनेर्ली, सातवे, पोर्ले तर्फ ठाणे, गोकुळ शिरगाव, कोतोली, सरुड, चिखली (कागल), हलकर्णी, निगवे खालसा, कळे हे मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत. तर, अनुसूचित महिलासाठी पट्टणकोडोली हा मतदारसंघ आरक्षित झाला आहे.
ओबीसी आरक्षण, मतदारसंघ - हेरले, कोडोली, पूणाल, घुणकी, रेंदाळ, दत्तवाड, शिये, वडणगे, पिंपळगाव (भुदरगड), उत्तुर, नेसरी, गवसे, माणगाव, कडगाव, भुदरगड, कुदनुर, अब्दुल लाट, रूकडी, यड्राव, दानोळी, राशिवडे बुद्रुक
ओबीसी (महिला) - हेरले, कोडोली, पूणाल, घुणकी, रेंदाळ, दत्तवाड, शिये, वडणगे, पिंपळगाव (भुदरगड), उत्तुर, नेसरी, गवसे, माणगाव (चंदगड), कडगाव (भुदरगड), कुदनुर, अब्दुल लाट, रूकडी, यड्राव, दानोळी, राशिवडे बुद्रुक.
ओपन महिला - सावे, येळवण जुगाई, टोप, भादोले, कुंभोज, चंदुर, बोरवडे, पाचगाव, वाशी, सांगरुळ, उदगाव, परिते, उचगाव, शिरोली दुमाला, तिसंगी, आकुर्डे, वाडी रत्नागिरी, कसबा वाळवे, सरवडे, पेरनोली, तुर्केवाडी, असलाज.
जिल्ह्यातील प्रभाग रचनेवरून अनेक तक्रारी झाल्या आहेत. यावर न्यायालयात तक्रारीही झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले असून, याबाबत आता आज, सुनावणी होणार आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीबाबत न्यायालयात काही निर्णय होतो का हे देखील पाहावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ७६ जागा असून, पंचायत समित्यांच्या १५२ जागा आहेत. याआधी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाला वगळून आरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्या टक्केवारीनुसार आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या आरक्षित गटातील जागा ठरणार आहेत.
पन्हाळा, मलकापूर नगरपालिकांसाठीही आरक्षण सोडत
जिल्ह्यातील पन्हाळा आणि मलकापूर या दोन नगरपालिकांसाठीही आरक्षण सोडत होणार आहे. या दोन्ही नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या प्रत्येकी ५ जागा आहेत. पूर्वी निवडणूक जाहीर झालेल्या अन्य सहा नगरपालिकांचा आरक्षण सोडतीत समावेश नाही.
जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, वडगाव, मुरगुड, कुरुंदवाड या आठ नगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यापैकी मलकापूर व पन्हाळा वगळता अन्य ६ नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता, तो स्थगित करण्यात आला.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर येथे नव्याने आरक्षण काढावे लागणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आज गुरुवारी आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केली आहे. मात्र यात नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम पूर्वी जाहीर झाला होता त्या नगरपालिकांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आज गुरुवारी फक्त पन्हाळा आणि मलकापूर या दोन नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत होणार आहे.