कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:50 PM2019-01-07T13:50:02+5:302019-01-07T13:52:38+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसाहाय्य उपलब्ध करून देऊन, बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि ...

Kolhapur Zilla Parishad's Tararani Festival started |  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवाचे अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी डावीकडून नंदू नाईक, एन. जी. देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापौर सरिता मोरे, पद्माराणी पाटील, अरुण इंगवले, राहुल माने उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ताराराणी महोत्सवास प्रारंभ बचतगट चळवळ सक्षम करण्यास प्राधान्य : शौमिका महाडिक

कोल्हापूर : जिल्ह्यात महिला बचतगटांना विविध व्यवसाय-उद्योगासाठी भाग भांडवल व अर्थसाहाय्य उपलब्ध करून देऊन, बचत गटातील महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच जिल्ह्यात बचतगट चळवळ अधिक सक्षम करण्यास प्रशासनाचे प्राधान्य राहील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून येथील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर रविवारपासून आयोजित ताराराणी महोत्सवाचे उद्घाटन व राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

यावेळी महापौर सरिता मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बालविकास सभापती वंदना मगदूम, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, हेमंत कोलेकर, डॉ. पद्माराणी पाटील, स्वरूपाराणी जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांच्या कलागुणांना वाव दिल्यास, तसेच त्यांना संधी उपलब्ध झाल्यास त्या संधीच सोने करतात, असा विश्वास व्यक्तकरून अध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन आणि महिला सबलीकरणाची महत्त्वपूर्ण काम होत असून, बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा प्रयत्नशील आहे.

महापौर सरिता मोरे म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे महत्त्वपूर्ण काम होत असून, महिलांनी नोकरीच्यामागे न लागता बचतगटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय-उद्योगामध्ये सक्रिय व्हावे. प्रारंभी प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बचतगटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, बंडा माने, बँक आॅफ इंडियाचे विभागीय अधिकारी एन. जी. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

समारंभास नाबार्डचे साहाय्यक महाप्रबंधक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक निलेश सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, रविकांत आडसुळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, कार्यकारी अभियंता तुषार बुरूड, साहाय्यक प्रकल्प अधिकारी सचिन पानारी, सम्राट पोतदार, राजेंद्र जाधव यांच्यासह पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सदस्या, अधिकारी आणि बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील बचत गटांनी भरीव कामगिरी करून कोल्हापूर जिल्ह्याचा लौकिक वाढविला आहे. या महोत्सवामध्ये विविध जिल्ह्यांतील १४८ समूहांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. कोल्हापूरवासीयांनी आगामी ४ दिवसांत ताराराणी महोत्सवास भेट देऊन बचतगटांच्या उत्पादनांची खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सुषमा देसाई
प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा

 

Web Title: Kolhapur Zilla Parishad's Tararani Festival started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.