हरभरा डाळीचा ‘कोल्हापुरी चटका’
By admin | Published: May 12, 2014 12:27 AM2014-05-12T00:27:39+5:302014-05-12T00:27:39+5:30
सचिन भोसले; कोल्हापूर सध्या हरभरा डाळीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याचे दिवस आहेत. रोज ९० टन हरभरा डाळीची विक्री होते.
सचिन भोसले; कोल्हापूर सध्या हरभरा डाळीची मोठ्या प्रमाणात आवक होण्याचे दिवस आहेत. रोज ९० टन हरभरा डाळीची विक्री होते. यामध्ये तयार हरभरे वेगळे केले जातात. द्विबीज प्रकारातील या डाळीला सुटे करण्याचे काम फ्लोअर मिलमधून केले जाते. याकरिता नेहमीच्या फ्लोअर मिलऐवजी खास हरभरा डाळीसाठी वेगळी यंत्रणा असणार्या यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. प्रामुख्याने त्यातून मोठी, चांगल्या प्रकारची डाळ म्हणून रजवाडी व लहान, कमी दर्जाची म्हणून चालू हरभरा डाळ अशी दोनच प्रकारची डाळ बाजारात उपलब्ध आहे. कोल्हापुरात रजवाडी हरभरा डाळीला मोठी मागणी आहे. इंदोर (मध्य प्रदेश) लातूर, उस्मानाबाद, उदगीर, गुलबर्गा, बार्शी, सोलापूर, आदी भागांतून मोठ्या प्रमाणात हरभरा डाळ राज्याच्या बहुतेक भागांत विक्रीसाठी येते. हरभर्याच्या अखंड शेंगेचे रूपांतर डाळीत करण्यासाठी ती फ्लोअर मिलमध्ये ती आणली जाते. तेथूनच बहुतांश राज्यांतील विविध जिल्ह्यांत हरभरा डाळ प्रतवारीप्रमाणे विकली जाते. हरभरा डाळ शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. त्याचबरोबर तीन प्रकारची जीवनसत्त्वे या डाळीत आहेत. हरभरा डाळीचा अतिवापर शरीरामध्ये पित्त वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अतिवापर वर्ज्य करावा, असा सल्ला डॉक्टर देतात. महाराष्ट्रात हरभरा डाळीच्या पिठाचा वापर प्रामुख्याने पुरणपोळी, आमटी, भाजी, भजी, वडे, बेसन लाडू, आदींमध्ये केला जातो. केवळ हरभरा डाळीचा कोल्हापुरी ‘चटका’साठी उपयोग करतात, तर वर्षाचे तिखट सांडगे करण्यासाठीही तिचा वापर केला जातो. हरभरा डाळीमध्ये... (१०० ग्रॅम) ४ऊर्जा - ६८६ किलो कॅलरीज ४साखर - २७.४२ ग्रॅम ४तंतुमय पदार्थ- ४.८ ग्रॅम ४फॅट- १.१५६ ग्रॅम ४प्रोटीन- ८.८६ ग्रॅम ४जीवनसत्त्वे- ४ गॅ्रम ४लोह- २.८९ ग्रॅम ४मॅग्नेशियम- ४८ मिलिग्रॅम ४फॉस्फरस- १६८ मिलिग्रॅम ४पोटॅशियम- २९१ मिलिग्रॅम ४सोडियम- ७ मिलिग्रॅम ४झिंक- १.५३ मिलिग्रॅम ४पाणी- ६०.२१ ग्रॅम प्रथम तुर्की या देशात मिळालेले हे वाण आहे. भारतीय बाजारपेठेत लहान, काळे कवच असलेले वाण पिकते. याचबरोबर भारतीय बाजारपेठेत ‘बॉम्बे’ नावाचे काळ्या कवचाच्या हरभर्याचे वाणही विकसित झाले आहे. युरोप आणि अफगाणिस्थान येथे काबुली वाण पिकते. बॉम्बे व काबुली चणे म्हणूनही ही जात प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात हरभरा डाळीचे पीक घेणारा देश म्हणून भारताचा अव्वल क्रमांक लागतो. याखालोखाल पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, तुर्की, म्यानमार, इथिओपिया व इराण येथेही हे पीक घेतले जाते.