कोल्हापूरकरांची ब्राझील अन् इंग्लंडला अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:15+5:302021-07-11T04:17:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतीय वेळेनुसार आज, रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेची, तर साडेबाराला ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : भारतीय वेळेनुसार आज, रविवारी पहाटे साडेपाच वाजता होणाऱ्या कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेची, तर साडेबाराला युरोपियन चषक फुटबाॅल स्पर्धेचीही अंतिम लढत होत आहे. दोन्ही स्पर्धेतील विजेतेपदांसाठी कोल्हापूकरांनी अनुक्रमे ब्राझील आणि इंग्लंडला अधिक पसंती दिली आहे. दोन्ही स्पर्धांची अंतिम लढत म्हणजे फुटबाॅलप्रेमींना मेजवानीच ठरली असून, सर्वत्र फुटबाॅलचा फिवर चढला आहे.
कोल्हापूरकरांचे फुटबाॅल प्रेम सर्वश्रुत आहे. त्यात स्पर्धा जरी अमेरिका आणि युरोपमध्ये असली तरी ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स, इंग्लंड, इटली, आदी संघांचे चाहते येथेही पाहण्यास मिळतील. त्यात पिवळा निळा, निळा, पांढरा अशा रंगांच्या जर्शीचेही चाहते या कोल्हापूरच्या फुटबाॅल पंढरीतच पाहण्यास मिळतील. विशेष म्हणजे कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम लढतीतील विजेतेपदासाठी कोल्हापूरकरांनी ब्राझीलला, तर युरोप चषक फुटबाॅल स्पर्धेत इंग्लंडला सर्वाधिक पसंती दिली आहे.
कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धा
कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेची अंतिम लढत रविवारी पहाटे होत आहे. यात ब्राझील संघातील नेमार, ल्युकास पॅक्वेताचा, थिंगोसिल्वा, कासेमिरू, डग्लस लुईझ, फॅबिनीे आणि गोलरक्षक अलीसन इडरसन, वेवरटोन यांच्यावर मदार आहे, तर अर्जेंटिनाकडून मेस्सी, एन. टॅगलाफिको, एम. ॲक्रोरा, जी. राॅड्रीग्ज, मार्टिनो क्वारटा, एल. मार्टिन्झ यांच्यावर मदार आहे. विशेष म्हणजे नेमारचा वारू सर्वाधिक जोरात आहे. त्याला रोखण्यासाठी मेस्सीसह जी मोन्टेल, राॅड्रिग्ज यांना अधिक कष्ट घ्यावे लागणार आहेत.
युरोपियन फुटबाॅल स्पर्धा
इटलीकडून फेडरिको चिआ, जुव्हेंटस लॉरेन्झो इनसिग्ने, एस.एस.सी नापोली, ज्योर्जिओ चिलीनी, जुव्हेंटस लिओनार्डो बोनुची, ग्यानलुइगी डोन्नरम्मा, तर इंग्लंडकडून जादोन सांचो, मार्कस रॅशफोर्ड, रहीम स्टर्लिंग, हॅरी केन, मेसन माउंट यांच्यावर अधिक भिस्त आहे.
कोट
स्पर्धा जरी सातासमुद्रापार असली तरी ब्राझील आणि इंग्लंडचे चाहतावर्ग कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आहे. विशेषतः पिवळा निळ्या जर्सीचा अधिक चाहता आहे. कोपा अमेरिकन चषक ????? तर युरोपीयन चषक इटली जिंकेल.
अनिकेत जाधव, भारताचा युवा फुटबॉलपटू
प्रतिक्रिया
गेल्या वर्षभरात एकही स्थानिक स्पर्धा झालेली नाही. तरीसुद्धा
युरोप व अमेरिकेतील फुटबॉल स्पर्धांमुळे कोल्हापुरात फुटबॉल फिवर आला आहे.
विकास पाटील, फुटबॉल संघटक