कोल्हापूरकर ! चला, पुण्यात घर घेऊया...
By admin | Published: March 9, 2016 12:31 AM2016-03-09T00:31:13+5:302016-03-09T00:54:33+5:30
‘लोकमत-पुणे प्रॉपर्टी शोकेस’ शनिवारपासून : पुण्यातील बांधकाम प्रकल्पांची मिळणार माहिती
कोल्हापूर : ‘स्मार्ट सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात आपले घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. कोल्हापूरकरांची या स्वरूपाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या गृहप्रदर्शनाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत’ने यावर्षी कोल्हापूरमध्ये पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांचे ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ हे प्रदर्शन शनिवारी (दि. १२) व रविवारी (दि. १३) हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसूदन हॉल येथे आयोजित केले आहे.
या उपक्रमाचे हे यशस्वी चौथे वर्ष आहे. प्रदर्शनात पुण्यातील २० बांधकाम व्यावसायिकांचे १३५ हून अधिक गृहप्रकल्प कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. यात अॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय यावेळी कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशांची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहे़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यांतील अनेक गृहइच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करीत हे प्रदर्शन यशस्वी केले आहे. पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी कोल्हापूरकरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तरी, इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे़
पुण्याकडे नेहमीच कल
पुण्याचा विस्तारणारा परीघ, घराच्या वाढत्या किमती, उच्च जीवनशैली, शिक्षणाचे नवनवीन पर्याय, नोकरी व उद्योगातील आधुनिक संधी यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांतील लोकांचा पुण्याकडे येण्याचा नेहमीच कल असतो़ पुण्यातील प्रॉपर्टीमधील गुंतवणूक ही आजवर अनेकांना फायदेशीर ठरल्यामुळे अनेकांकडून राहत्या घरासोबत सेकंड होम म्हणून पुण्याचाच विचार केला जातो़
या नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग
गार्डियन डेव्हलपर्स, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा़ लि़, पाटे डेव्हलपर्स, कुशल लॅँडमार्क्स प्रा़ लि़, सिटी कॉर्पोरेशन, वसुधा लॅँडमार्क्स प्रा़ लि़, गोयलगंगा ग्रुप, सिद्धिविनायक गु्रप्स, निर्माण डेव्हलपर्स, मॅपल शेल्टर्स, सारथी ग्रुप, साईरंग डेव्हलपर्स, द स्केपर्स, शारदा ग्रुप, पार्कन्स ग्रुप, भंडारी असोसिएट्स़, श्री. व्यंकटेश बिल्डकॉन, प्लॅटिनम प्रॉपर्टी.