कोल्हापूरकर सुसाट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:42 AM2018-02-19T00:42:47+5:302018-02-19T00:43:02+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’ने आता आपली नवीच ओळख प्रस्थापित केली आहे. या वृत्तपत्र समूहातर्फे महाराष्ट्रात झालेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत २५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले.
‘लोकमत महामॅरेथॉन’च्या संस्थापिका रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून ही मॅरेथॉन सुरू झाली. तिची सुरुवात नाशिकपासून झाली. त्यानंतर औरंगाबाद, नागपूरला झाल्यानंतर ती कोल्हापुरातही झाली. सर्वत्र शेवटच्या दोन दिवशी नोंदणी बंद करावी लागली इतका प्रतिसाद महामॅरेथॉनला सर्वच शहरांत मिळाला. या चारीही ठिकाणी झालेल्या सर्किट मॅरेथॉनमध्येही स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा आजवरचा मॅरेथॉन स्पर्धेतील उच्चांकी सहभाग आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अन्य कोणत्याच स्पर्धेत लोक सहभागी झालेले नाहीत. वाचकांचा जसा ‘लोकमत’वर अढळ विश्वास आहे, तसाच विश्वास ‘लोकमत’ने या मॅरेथॉनच्या क्षेत्रात निर्माण केला.
‘लोकमत’ वर्षभर महाराष्ट्रभर अनेक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. त्यामध्ये आता महामॅरेथॉनची भर पडली. महामॅरेथॉन म्हटलं की ‘लोकमत’ असे नाते घट्ट व्हावे इतके चांगले आयोजन पहिल्याच वर्षी ‘लोकमत’ने करून दाखविले. कोल्हापुरात आयोजित केलेल्या केपीएल फुटबॉल स्पर्धेलाही करवीरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ज्या क्षेत्रात पाऊल टाकायचे तिथे जे काही करायचे ते अत्युच्च असले पाहिजे, असा प्रयत्न ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह करीत आला आहे.
शिस्तबद्ध पद्धतीने हजारो स्पर्धकांचा सहभाग; कोल्हापुरातील आजवरची सर्वांत मोठी मॅरेथॉन
महाराष्ट्रासह, कोकण, कर्नाटक, गोवा, बिहारमधूनही स्पर्धक सहभागी
नेसरीचा अमित पाटील खु्ल्या गटात, प्रौढ गटात पांडुरंग पाटील तर
डिफेन्स गटात दीपक कुंभारची बाजी
खासदार, आमदार, अधिकाºयांसह
मान्यवरांचाही मोठ्या जोशात सहभाग