पारा वाढल्याने कोल्हापूरकर घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:44+5:302021-03-30T04:12:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सोमवारी ४० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने कोल्हापूरकर घामाघूम ...

Kolhapurkar sweats due to increase in mercury | पारा वाढल्याने कोल्हापूरकर घामाघूम

पारा वाढल्याने कोल्हापूरकर घामाघूम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, सोमवारी ४० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्याने कोल्हापूरकर घामाघूम झाले आहेत. सकाळी आठपासूनच उकाड्यास सुरुवात हाेत असून येत्या आठवड्यात पारा आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उकाड्यास सुरुवात झाली. मार्चमध्ये तर कमाल तापमान सरासरी ३७ डिग्रीपर्यंत राहिले. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायण आग ओकत आहे. सकाळी आठपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. दहा वाजता तर अंगातून घामाच्या धारा लागतात. दुपारी बारा वाजता तर अंग भाजून निघते. दिवसभर उष्मा वाढतच जातो. किमान तापमानातही वाढ होत असल्याने सायंकाळीही कमालीचा उष्मा जाणवतो. सोमवारी किमान तापमान २३ डिग्री, तर कमाल ४० डिग्रीपर्यंत पाेहोचले होते. आगामी आठवड्यात उष्मा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पिकांना पाण्याची ओढ वाढली

उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम पिकांवरही झाला आहे. पाणी देऊन तीन-चार दिवस झाले की लगेच पिके कोमेजतात. पिकांची पाण्याची ओढ वाढली आहे.

दिवसा बाहेर पडू देईना, रात्री घरात बसवेना

दिवसभरात जीवघेणा उष्मा बाहेर पडू देत नाही. दुपारी रस्त्यावरून जाताना गरम वाफा अंगावर येतात. त्यामुळे विशेषत: वयाेवृध्दांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. रात्रीही उष्मा वाढत असल्याने घरात बसवत नाही.

असे राहील तापमान डिग्रीमध्ये...

वार किमान कमाल

मंगळवार ३९ २२

बुधवार ४१ २२

गुरुवार ४० २०

शुक्रवार ४० २१

शनिवारी ४१ २२

रविवार ४० २१

Web Title: Kolhapurkar sweats due to increase in mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.