वीकेंड लॉकडाऊनलाच कोल्हापूरकर अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:54+5:302021-07-19T04:16:54+5:30

कोल्हापूर : सरसकट दुकाने आज सोमवारपासून सुरू होत असल्याच्या दिवशीच कोल्हापूरकर अनलॉकच्या मानसिकतेत दिसले. रविवारी वीकेंड लॉकडाऊन असतानाही रस्त्यावरची ...

Kolhapurkar unlocked on weekend lockdown | वीकेंड लॉकडाऊनलाच कोल्हापूरकर अनलॉक

वीकेंड लॉकडाऊनलाच कोल्हापूरकर अनलॉक

Next

कोल्हापूर : सरसकट दुकाने आज सोमवारपासून सुरू होत असल्याच्या दिवशीच कोल्हापूरकर अनलॉकच्या मानसिकतेत दिसले. रविवारी वीकेंड लॉकडाऊन असतानाही रस्त्यावरची गर्दी पाहून त्याचा विसर पडल्यासारखीच परिस्थिती होती. भाजी मार्केटमध्ये तर गर्दी ओसंडून वाहत होती.

कोल्हापुरात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होत आहे, पण रविवारपर्यंत जुनेच निर्बंध लागू असतानाही त्याची कोठेही अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसले नाही. सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, अशा अविर्भावातच लोक वावरत होते.

जुन्या नियमानुसार शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊन आहे. या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार होती, पण प्रत्यक्षातील चित्र वेगळेच होते. ठराविक दुकाने वगळता बहुतांश व्यवहार सुरूच असल्याचे दिसत होते. त्यामुळे रस्त्यावरची गर्दीही कायम होती. वाहनांची वर्दळ वाढल्याने शहरातील सर्व सिग्नल सुरूच होते. दुपारी गर्दी ओसरल्यानंतर सिग्नल बंद झाले. एस.टी, के.एम.टीच्याही फेऱ्या दिवसभर सुरुच होत्या.

चौकट ०१

भाजीमंडई हाऊसफुल्ल

विशेषता भाजीमार्केटमध्ये गर्दी जास्त दिसत होती. ताेंडावर मास्क आहे, पण सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पायदळी तुडवत लोक भाजीपाला, फळे खरेदी करताना दिसत होते. लक्ष्मीपुरीसह शहरातील मंडईत कमी अधिक प्रमाणात तीच परिस्थिती होती.

चौकट ०२

दुकाने उघडण्यास सज्ज

गेला आठवडाभर केवळ अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा पुरवणारी दुकानेच सुरू होती. तत्पूर्वी त्याच्या मागील आठवड्यात केवळ पाच दिवस सरसकट दुकाने सुरु झाली होती. तेव्हा दुकानदारांनी दुकानांची स्वच्छता मोहीम राबवली असल्याने या सोमवारपासून प्रत्यक्ष दुकाने सुरू असताना कुठेही दुकाने उघडण्याची वेगळी तयारी केल्याचे चित्र रविवारी दिसले नाही.

चौकट ०३

मॉलमध्ये गर्दी

अर्धे शटर उघडून मागील आठवड्यात मागच्या दाराने व्यवसाय झाला असल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांनी रविवारी विश्रांती घेतल्याचेही बंद शटरवरून दिसत होते. सोमवारपासून दुकाने उघडणारच आहेत, तर घ्या एक दिवसाची सुट्टी अशीही त्यामागील मानसिकता दिसत होती. त्यामुळे मोठ्या दुकानांसमोर शुकशुकाट दिसत होता, पण याचवेळी मॉलमध्ये मात्र गर्दी उसळल्याचे चित्र होते.

Web Title: Kolhapurkar unlocked on weekend lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.