थुंकीमुक्त आणि स्वच्छ कोल्हापूरसाठी कोल्हापूरकरांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:12 AM2021-02-02T11:12:36+5:302021-02-02T11:16:14+5:30
Health Kolhapur- आपल्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारातून ज्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले अशा महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना कृतीमधून आदरांजली वाहण्यात आली. अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने यांच्यावतीने नागरिकांच्या मध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली होती.
कोल्हापूर-आपल्या जीवनातून, कार्यपद्धतीतून, आचार-विचारातून ज्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समाजाला सांगितले अशा महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना कृतीमधून आदरांजली वाहण्यात आली. अँटी-स्पिटिंग मुव्हमेंटच्या वतीने यांच्यावतीने नागरिकांच्या मध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जनजागृती व्हावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली होती.
'थुंकीमुक्त कोल्हापूर' चळवळीमुळे आशादायी बदल घडू लागले आहेत. या प्रसंगी अनेक दुकानात थुंकीमुक्त कोल्हापूरच्या वतीने स्टिकर्स लावण्यात आली. दुकानाच्या दारात थुंकून घाण करणाऱ्यांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी अत्यंत टोकाच्या भावना व्यक्त केल्या परंतु सरकारी यंत्रणा दंडात्मक कारवाई न करता या बाबीकडे सोईस्कर दुर्लक्ष करताना दिसत असल्याची खंत सर्वच स्तरातून मांडली जात आहे.
केशवराव भोसले नाट्यगृह पासून सुरू झालेली पदयात्रा मिरजकर तिकटी - बिनखांबी गणेश मंदिर - महाद्वार रोड वरून पापाची तिकटीपापाची तिकटी येथे असणाऱ्या गांधी पुतळा परिसर येथे विसर्जित झाली. हातामध्ये जनजागृती करणारे फलक, लक्षवेधी टोप्या घालून नागरिकांनी उस्फूर्त सहभाग या पदयात्रेमध्ये नोंदवला.
राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे, सागर बकरे, सुनिता मेंगाणे, नीना जोशी, ललिता गांधी, ललित गांधी, गीता हासुरकर, अश्विनी गोपूडगे, मीनाक्षी सुतार, राहुल चौधरी, दीपा शिपूरकर, बंडा पेडणेकर, अभिजित गुरव, जीवन बोडके, विद्याधर सोहनी, कपिल मुळे, डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, महाद्वार व्यापारी आणि रहिवासी असोसिएशनचे अशोक लोहार, संदीपराव जाधव, शामराव जोशी, पृथ्वीराज जगताप, महेश उरसाल, रमाकांत ऊरसाल, शिवनाथ पावसकर, मनोज बहिरशेठ, किरण धर्माधिकारी यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. युवराज लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
या थुंकवीरांना चाप लावण्यात प्रशासन बोटचेपी भूमिका का घेते आहे असे सर्वच नागरिक विचारताना दिसताहेत. येत्या काळात कोल्हापूर स्वच्छ व निरोगी करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे आंदोलनाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल.
-दिपा शिपुरकर