ऐतिहासिक वारसा जपण्यात कोल्हापूरकरांचा पुढाकार--शाहू छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:13 PM2019-11-20T13:13:13+5:302019-11-20T13:23:54+5:30

१९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Kolhapurkar's initiative in preserving historical heritage | ऐतिहासिक वारसा जपण्यात कोल्हापूरकरांचा पुढाकार--शाहू छत्रपती

कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे मंगळवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते ‘जागतिक वारसा सप्ताहा’चे उद्घाटन झाले. यावेळी आनंद माने, अमरजा निंबाळकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आझाद नायकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे: ‘हेरिटेज सप्ताह’चे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तो जपण्यासाठी कोल्हापूरकरांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. येथील माणसांमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्याचा ध्यासच असल्याने प्रशासनाच्या जोडीला विविध संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते अशा वास्तूंच्या जतन आणि संवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न करतात. त्यामुळे ‘हेरिटेज सप्ताह’ यशस्वी होईल, असा विश्वास मंगळवारी शाहू छत्रपती यांनी येथे व्यक्त केला.

कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे जिल्हा प्रशासन हेरिटेज समितीतर्फे आयोजित हेरिटेज सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते. १९ ते २५ नोव्हेंबर हा आठवडा ‘हेरिटेज वीक’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत छायाचित्र स्पर्धा, हेरिटेज वॉक, हेरिटेज हंट, तसेच पाककृती स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शाहीर आझाद नायकवडी यांनी रचलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसवरील पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर यांनी हेरिटज सप्ताह साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच शहर आणि परिसरातील पुरातन वास्तूंमुळे कोल्हापूरचे महत्त्व जगाच्या नकाशावर वाढत असल्याने त्यांचे जतन करणे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.

यानंतर जन्मस्थळाच्या परिसरात झालेल्या हेरिटेज वॉकला युवक युवतींनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी ‘क्रिडाई’चे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, ‘आयआयडी’चे संदीप घोरपडे, चंदन मिरजकर, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, आनंद माने, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री, विजय केसरकर तसेच रोटरी क्लबचे सूर्यकांत पाटील, गिरीश जोशी, शाहीर डॉ. राजू राऊत उपस्थित होते.

कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे मंगळवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते ‘जागतिक वारसा सप्ताहा’चे उद्घाटन झाले. यावेळी आनंद माने, अमरजा निंबाळकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आझाद नायकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 

 

Web Title: Kolhapurkar's initiative in preserving historical heritage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.