कोल्हापूरचे ‘ब्रँडिंग’, ‘मार्केटिंग’ हवे--पर्यटनदिनाच्या चर्चासत्रातील सूर;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:39 AM2017-09-28T00:39:46+5:302017-09-28T00:41:15+5:30

 Kolhapur's 'Branding', 'Marketing' - Tourism; | कोल्हापूरचे ‘ब्रँडिंग’, ‘मार्केटिंग’ हवे--पर्यटनदिनाच्या चर्चासत्रातील सूर;

कोल्हापूरचे ‘ब्रँडिंग’, ‘मार्केटिंग’ हवे--पर्यटनदिनाच्या चर्चासत्रातील सूर;

Next
ठळक मुद्देहॉटेल मालक संघ, पथिक प्रतिष्ठानचा उपक्रमआम्ही केवळ व्यवसाय म्हणून पर्यटन विकासाकडे पाहात नाही तर सामूहिक लाभासाठी आम्ही कार्यरत आहोत.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमध्ये जे-जे काही आहे ते-ते एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. फक्त त्याचे ‘बँ्रडिंग’ आणि ‘मार्केटिंग’ करण्याची गरज असल्याचा सूर जागतिक पर्यटनदिनी आयोजित चर्चासत्रामध्ये व्यक्त करण्यात आला.

कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि पथिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुधवारी झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक सतीश लळीत होते. विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी अतिशय मौलिक सूचना केल्या.
यावेळी अरुणा देशपांडे, स्वयंसिद्धाच्या तृप्ती पुरेकर, प्राची देशपांडे, पल्लवी कोरगावकर आणि अमरजा निंबाळकर या पर्यटनक्षेत्रामध्ये कार्यरत असणाºया महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच अंध आणि अपंग असूनही या क्षेत्रात उत्तम काम करणारे संतोष परीट, तानाजी पोवार, राधानगरी पर्यटनाचे अ‍ॅप तयार करणारा विशाल घोलकर यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर म्हणाले, गेली अनेक वर्षे आम्ही कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी कार्यरत आहोत. आता याबाबत जागरूकता आली असून अनेक व्यक्ती, संस्था आमच्यासोबत आहेत. याही पुढे आमचा सर्वांना पाठिंबा असेल. सचिव सिद्धार्थ लाटकर म्हणाले, आम्ही केवळ व्यवसाय म्हणून पर्यटन विकासाकडे पाहात नाही तर सामूहिक लाभासाठी आम्ही कार्यरत आहोत.
वासीम सरकवास म्हणाले, विदेशी पर्यटकांनाही कोल्हापूरची भुरळ पडली आहे. विश्वजित घाटगे म्हणाले, शाहू महाराजांचे कर्तृत्व वेगळ्या पद्धतीने पर्यटकांसमोर मांडण्याची गरज आहे.

रवी सरदार म्हणाले, अन्य राज्यांतील डोमेस्टिक टूर आॅपरेटर्सना कोल्हापूरची माहिती देणे आवश्यक आहे.
यावेळी डॉ. शहाजीराव देशमुख , ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक बाळ पाटणकर, पथिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अरुणा देशपांडे, कर्नाटकचे पर्यटन सल्लागार डॉ. अमर आडके, ॠतुराज इंगळे, अमरजा निंबाळकर, पल्लवी कोरगांवकर, सूजय पित्रे, समीर देशपांडे, शंकरराव यमगेकर, तृप्ती पुरेकर, अमित हुक्केरीकर, प्राची देशपांडे, सागर पाटील, विनय दबडे, केदार गयावळ यांनी पर्यटनाशी निगडित मुद्द्यांची मांडणी केली.

लवकरच कोल्हापूरची पर्यटन पुस्तिका, नकाशा
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गप्रमाणेच कोल्हापूरची पर्यटन पुस्तिका आणि पर्यटन नकाशा लवकरच माहिती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी चर्चासत्राचे अध्यक्ष माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी सांगितले.

चर्चासत्रातील सूचना
पुण्याहून येताना कोल्हापुरात नेमके आता कुठे वळायचे कळत नाही, फलक उभारावेत.
मर्दानी खेळांचे नेहमी पर्यटकांना दर्शन घडवावे.
मसाई पठारावर ‘इको गार्डन’ करावे.
जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर माहिती फलक लावावेत.
प्रशिक्षित गाईडस्ची उपलब्धता आवश्यक.

चित्रीकरणासाठी स्थळांचा विकास केला जावा.

Web Title:  Kolhapur's 'Branding', 'Marketing' - Tourism;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.