कारगिल, लडाखमधील जवानांसाठी कोल्हापूरकरांचे ‘देश रक्षाबंधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:28 AM2021-08-19T04:28:44+5:302021-08-19T04:28:44+5:30
येथील महासैनिक दरबार हॉलमधील या कार्यक्रमास सैनिक लिगचे अध्यक्ष व निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील (सांगवडेकर), माजी सैनिक वेलफेअर ...
येथील महासैनिक दरबार हॉलमधील या कार्यक्रमास सैनिक लिगचे अध्यक्ष व निवृत्त सुभेदार एन. एन. पाटील (सांगवडेकर), माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे लक्ष्मीकांत हंडे, पाश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विजय पाटील प्रमुख उपस्थित होते. सैनिकांचे आत्मबळ आणि नैतिक बळ वाढविणारा ‘देश रक्षाबंधन’ हा उपक्रम कौतुकास्पद असून त्याची लोकचळवळ व्हावी. नारीशक्ती दुर्गा मातेचा अवतार असून त्यांनी राख्यांच्या माध्यमातून सैनिकांना दिलेले पाठबळ महत्त्वाचे असल्याचे शिवाजीराव पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमात कर्मवीर इंग्लिश मेडियम स्कूल, शिवसमर्थ जायएंट ग्रुप, महालक्ष्मी बचत गट, चैतन्य हास्य क्लबच्यावतीने सुमारे चार हजार राख्या प्रमुख उपस्थितांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे, डॉ. संदेश कचरे, सुरेश बडवे, शोभा वोरा, सीमा मकोटे, रेवती घाटगे, सुशीला पाटील, कमलाकर किलकिले, महेश कामत, मदन भोसले, आदिती घाटगे, शाहिन शेख, मालोजी केरकर, आदी उपस्थित होते. ट्रस्टचे सचिव राजेंद्र मकोटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सायली कचरे यांनी आभार मानले.
चौकट
सर्व शाळांमध्ये उपक्रम राबवावा
राखी संकलनात विविध ४० संघटनांनी योगदान दिले आहे. सुमारे पाच हजार राख्या कारगिल आणि लडाख येथील सीमेवर देश रक्षणासाठी तैनात असणाऱ्या सैनिक, जवानांसाठी पाठविण्यात येणार आहेत. मूल्य शिक्षणाचा एक भाग म्हणून सर्व शाळांमध्ये ‘देश रक्षाबंधन’ उपक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी किशोर घाटगे यांनी केली.
चौकट
अफगाणिस्तानासारखी स्थिती उद्भवणार नाही
चीनला गलवानमध्ये भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. अफगाणिस्तानात उद्भवलेली परिस्थिती हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असून भारतीय लष्कर सक्षम असल्याने कधी अशी परिस्थिती देशात उद्भवणार नसल्याचे शिवाजीराव पवार यांनी सांगितले.