राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:00+5:302021-03-13T04:42:00+5:30
कोल्हापूर : हाॅकी इंडियामार्फत झारखंड येथे ११ ते १७ मार्चदरम्यान होणाऱ्या कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या श्रेया महिंद, ...
कोल्हापूर : हाॅकी इंडियामार्फत झारखंड येथे ११ ते १७ मार्चदरम्यान होणाऱ्या कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या श्रेया महिंद, अपूर्वा शिंदे, तनिष्का शिंदे, क्रांती ननावरे या चौघींची राज्य संघात निवड झाली.
या चौघींची निवड पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या चाचणी स्पर्धेतून झाली. श्रेया व अपूर्वा या बळवंतराव यादव हायस्कूल (पेठवडगाव):, तनिष्का शिंदे ही जोतिर्लिंग विद्यामंदिर (वडणगे-निगवे), क्रांती ही प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. या खेळाडूंना हाॅकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे, हाॅकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, विनोद नाईकवडी, सचिव मोहन भांडवले, आंतरराष्ट्रीय हाॅकी पंच श्वेता पाटील, संताजी भोसले, महेश सूर्यवंशी, राहुल गावडे, संतोष चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : ११०३२०२१-कोल-हाॅकी
ओळी : झारखंड येथे होणाऱ्या कनिष्ठ मुलींच्या राष्ट्रीय हाॅकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या चौघींची निवड झाली आहे.