कोल्हापूरच्या अधिष्ठाताची बदली, डॉ. रामानंद नियुक्त, कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:08 PM2020-05-22T20:08:55+5:302020-05-22T20:13:27+5:30

येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३३ नवे कोरोनाचे रूग्ण सापडले असून एकूण संख्या २६१ वर गेली आहे.

Kolhapur's incumbent replaced abruptly, | कोल्हापूरच्या अधिष्ठाताची बदली, डॉ. रामानंद नियुक्त, कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

कोल्हापूरच्या अधिष्ठाताची बदली, डॉ. रामानंद नियुक्त, कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

Next
ठळक मुद्देकोल्हापूरच्या अधिष्ठाताची तडकाफडकी बदली, डॉ. रामानंद नियुक्तकोल्हापूरची कोरोनाग्रस्तांची संख्या २६१ वर

कोल्हापूर  :  येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी सायंकाळी तडकाफडकी जळगावला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी डॉ. जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी दिवसभरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३३ नवे कोरोनाचे रूग्ण सापडले असून एकूण संख्या २६१ वर गेली आहे.

डॉ. गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून बदली करण्यात आली आहे. तर डॉ. रामानंद सध्या भाउूसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे औषधशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधीही कोल्हापूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिले होते. 

डॉ. गजभिये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्यातील मतभेदांची जिल्ह्यातील मंत्र्यांनाही कल्पना होती. या दोघांमधील वादाचा फटका सध्या कोरोनाच्या संकटावेळीही बसत होता.

अशातच डॉ. गजभिये यांच्या कामाच्या पध्दतीबाबतही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी होत्या. त्यातूनच ही बदली झाल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी हे आदेश काढले.

 

Web Title: Kolhapur's incumbent replaced abruptly,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.