जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती'

By समीर देशपांडे | Published: September 17, 2022 05:39 PM2022-09-17T17:39:36+5:302022-09-17T18:23:39+5:30

याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती.

Kolhapur's Kavita Chawla became the first millionaire in the 14th episode of Kaun Banega Crorepati | जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती'

जगात भारी 'आम्ही कोल्हापुरी', KBC'त कविता चावला बनल्या 'करोडपती'

googlenewsNext

कोल्हापूर : शहराजवळील गांधीनगरच्या रहिवासी कविता चावला या ‘कौन बनेगा करोडपती’ च्या १४ व्या भागातील पहिल्या करोडपती बनल्या आहेत. बुधवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे चित्रीकरण झाले असून त्याच्या या यशाची कथा सांगणाऱ्या भागाचे प्रसारण सोमवारी आणि मंगळवारी संध्याकाळी होणार आहे.

गांधीनगर येथील विजय चावला हे कापड व्यापारी असून त्यांच्या पत्नी कविता या गृहिणी आहेत. याआधीही त्यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भाग घेतला होता. परंतू त्यात त्यांना हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली नव्हती. तरीही त्यांनी जिद्द न सोडता पुन्हा या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली.

मुलगा विवेकसोबत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. एका, एका प्रश्नाची उत्तरे बरोबर देत त्यांनी तब्बल एक कोटी रूपयांचे बक्षिस जिंकले आहे. एक कोटी रूपये मिळवून देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. डोळ्यात पाणी उभे राहिले. आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी एकाचवेळी तब्बल एक कोटी रूपयांचे बक्षिस मिळवल्याने त्यांचे यश हे कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.

बच्चनवेड्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला कोल्हापूरमधून ४० बच्चनवेड्यांनी उपस्थिती दर्शवली होती. कविता यांना एक कोटी रूपयांचे बक्षिस जाहीर होताच या उपस्थित कोल्हापूरच्या बच्चनवेड्यांनी जल्लोष केला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनीही चावला यांनी कोल्हापूरचे नाव उज्जवल केल्याची भावना व्यक्त केली.

Web Title: Kolhapur's Kavita Chawla became the first millionaire in the 14th episode of Kaun Banega Crorepati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.