राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे चमकले
By सचिन भोसले | Published: August 10, 2023 07:17 PM2023-08-10T19:17:19+5:302023-08-10T19:19:12+5:30
कोल्हापूर : नोएडा येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरे याने पुण्याच्या अर्णव भाटिया याच्या साथीने ...
कोल्हापूर : नोएडा येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व डकरे याने पुण्याच्या अर्णव भाटिया याच्या साथीने बुधवारी उपविजेतेपदाला गवसणी घातली.
बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूलच्या टेनिस कोर्टवर झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अथर्व व अर्णव (पुणे) या जोडीला अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशच्या अनय पांडे-अरमान दुवा या जोडीने ६-२, २-६, ३-१० असा पराभव केला.
उपांत्य फेरीत अथर्व व अर्णव जोडीने अर्जुन कक्कर-अनिकेत सिंग या जोडीचा ६-३, ६-४ असा तर उपांत्यपूर्व फेरीत द्वितीय मानांकित दिल्लीच्या देवांश सिंग-तनिष गुरेजा जोडीचा ७-६(७-५), ७-५ असा पराभव केला. पहिल्या फेरीत त्यांनी शौर्य शर्मा-गौरीश खुराना या जोडीचा ९-३ असा पराभव केला.
अथर्व हा कोल्हापूर जिल्हा टेनिस असोसिएशनचा खेळाडू असून, त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अर्शद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.