कोल्हापूर : आकाशात दिसली ती तबकडी होती का?, पन्हाळावासीयांमध्ये कुतुहल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:16 AM2022-06-02T11:16:01+5:302022-06-02T11:28:10+5:30

सकाळी दोन तास आकाशात दिसली ही वस्तू.

Kolhapurunidentified object seen in sky panhala kolhapur people got curious | कोल्हापूर : आकाशात दिसली ती तबकडी होती का?, पन्हाळावासीयांमध्ये कुतुहल

कोल्हापूर : आकाशात दिसली ती तबकडी होती का?, पन्हाळावासीयांमध्ये कुतुहल

googlenewsNext

कोल्हापूर - पन्हाळ्यातील आकाशात पश्चिम दिशेच्या बाजूला खुप उंचीवर पांढरीशुभ्र मोठी गोलाकार फुग्यासारखी दिसणारी आणि तबकडी सारखी वाटणारी एक वस्तू दिसून आली. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत अकाशात ही वस्तू दिसत होती. बहुतांश पन्हाळा नगरवासीयांनी ही उडती वस्तू पाहिली.

आज सकाळी आकाशात सुमारे तीन तास खुप उंचीवर फुग्यासारखा (पण फुगा नाही) असा एक पांढराशुभ्र गोल दिसून आला. सकाळी फिरावयास जाणाऱ्या लोकांच्या हा गोल लक्षात आला. ही आकाशात दिसणारी वस्तू अत्यंत कमी वेगाने पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. पन्हाळा येथील रमेश पाटील यांना या पांढऱ्या गोलाबाबत वेगळेपण जाणवल्याने त्यांनी शिवाजी विद्यापीठ अवकाश संशोधन केंद्रात संपर्क केला. पण तो अयशस्वी ठरला. पुढे त्यांनी त्याचे निरीक्षण केले, हा गोल उत्तर दिशेला सरकत गेला आणि मग पन्हाळ्यातून दिसेनासा झाला, असे रमेश पाटील यांनी सांगितले. रमेश पाटील यांनी आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ बनवला. 

सहज डोळ्याने पहाता येईल अशी पण खूप उंच अंतरावरून ही वस्तू आकाशात पाहायला मिळाल्याने नागरिकांत हे काय असेल याचे कुतूहल निर्माण झाले होते. दरम्यान, कदाचित हा पांढरा दिसणारा गोल हवामान आणि येणारा पाऊस या संर्दभातील अवकाश संशोधनाद्वारे तपासणीचे यंत्र असावे, असे एका जाणकाराने सांगितले.

Web Title: Kolhapurunidentified object seen in sky panhala kolhapur people got curious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.