कौलगेत युवतीवर खूनी हल्ला
By admin | Published: June 26, 2017 09:51 PM2017-06-26T21:51:19+5:302017-06-26T21:51:29+5:30
कौलगे (ता. कागल) येथे घरात घुसून महाविद्यालयीन युवतीवर तरुणाने चाकूने खूनी हल्ला केला. गळ्यावर, पाठीवर खोलवार वार झाल्याने
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ - कौलगे (ता. कागल) येथे घरात घुसून महाविद्यालयीन युवतीवर तरुणाने चाकूने खूनी हल्ला केला. गळ्यावर, पाठीवर खोलवार वार झाल्याने युवती गंभीर जखमी झाली. किशोरी जनार्दन दावणे (वय १९) असे तिचे नाव आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून नातेवाईकांनी तिला तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी मुरगुड पोलीसांनी संशयित आरोपी अनिल निवृत्ती कांबळे (वय ३९) याला अटक केली. तो मनोरुग्ण असून त्यातून त्याने हल्ला केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, किशोरी दावणे हि बारावी पास झाली आहे. नुकतेच तिने कला शाखेत पदवीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतला आहे. आई-वडील शेती करतात. नेहमीप्रमाणे ते दूपारी शेतात गेले होते. त्यामुळे ती एकटीच घरी टीव्ही पाहत होती. घरासमोर राहणारा अनिल कांबळे हा घरात घुसूला. त्याने काही न बोलता तिच्या गळ्यावर, पाठिवर चाकूने वार केले. अचानक घडलेल्या याप्रकाराने तीने आरडाओरडा केला. यावेळी घराशेजारील लोक पळत आले. इतक्यात कांबळे याने तेथून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किशोरीला नातेवाईक व नागरिकांनी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. याठिकाणी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिची प्रकृत्ती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
संशयित कांबळे याचे गावातच सायकल पंकचर काढण्याचे दुकान आहे. त्याने कोणत्या कारणातून हल्ला केला, हे स्पष्ट झाले नव्हते. याप्रकरणी उलट-सुलट चर्चा गावात आहे. तो मनोरुग्ण असून त्यातून त्याने हल्ला केला असण्याची शक्यता मुरगुड पोलीसांनी व्यक्त केली आहे. त्याला अटक केली असून त्याचेकडे सखोल चौकशी सुरु आहे.