कोरोचीचा पाण्याचा प्रश्न मिटला; परंतु योजनाच बनली प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:41+5:302021-02-27T04:30:41+5:30

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर फिरावे लागत होते. महिन्यातून दोनवेळा ...

Korochi's water problem is solved; But the plan became the question | कोरोचीचा पाण्याचा प्रश्न मिटला; परंतु योजनाच बनली प्रश्न

कोरोचीचा पाण्याचा प्रश्न मिटला; परंतु योजनाच बनली प्रश्न

googlenewsNext

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर फिरावे लागत होते. महिन्यातून दोनवेळा पिण्याचे पाणी या गावाला मिळत होते. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. याची दखल घेत आमदार प्रकाश आवाडे यांनी गावात जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र, ऑडिटवरून ही योजनाच सध्या एक प्रश्न बनून राहिली आहे.

गावाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली. ३१ जुलै २००७ ला चार कोटी २७ लाख ९ हजार ३०० रुपयांचा आराखडा तयार करून जिल्हा परिषदेने त्याला मंजुरी दिली. त्यानुसार रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावर जॅकवेल बांधून तेथून १५० अश्वशक्ती क्षमतेच्या पंपाने पाणी उपसा करण्याचे ठरविण्यात आले. कोरोचीमधील विवेकानंदनगरमध्ये ०५.१० दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.

दरम्यान, पुन्हा २४ डिसेंबर २०१० ला सुधारित आराखडा तयार करून सहा कोटी २६ लाख ६३ हजार ८६८ रुपयांची मंजुरी जिल्हा परिषदेकडून घेतली. त्यानंतर १ एप्रिल २०११ मध्ये काम पूर्ण करण्यात आले. (पूर्वार्ध)

चौकट

सन २०११ मध्ये गावाची लोकसंख्या वीस हजार ४२० होती. गावाला एक दिवसआड पाणी मिळावे यासाठी जलस्वराज्य प्रकल्प पाणीपुरवठा योजना आणण्यात आली. त्यानुसार घरगुती पाणीपट्टी १८०० रुपये, तर औद्योगिक वापरासाठी वार्षिक पाणीपट्टी तीन हजार ६०० रुपये आकारण्याचे ठरविण्यात आले.

Web Title: Korochi's water problem is solved; But the plan became the question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.