कोरवी आत्महत्याप्रकरणी चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:09+5:302021-07-08T04:17:09+5:30
कोल्हापूर : आरोग्य सेवक रमेश कोरवी यांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. माता व ...
कोल्हापूर : आरोग्य सेवक रमेश कोरवी यांच्या आत्महत्येप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई आणि वैद्यकीय अधीक्षक यांची दोन सदस्यीय समिती सध्या ही चौकशी करत आहे. कदाचित गुरुवारी हा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे.
कोरवी यांनी गेल्या आठवड्यात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिट्टी लिहून ठेवली होती. कोरवी यांच्या आत्महत्येनंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांची चाैकशी समिती स्थापन केली आहे. त्यानुसार डॉ. देसाई यांनी मंगळवारी हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन चौकशी केली.
सलग दुसऱ्या दिवशी डॉ. देसाई हे आपल्या सहकाऱ्यांसह चौकशीच्या कामात असून बुधवारी दुपारपर्यंत दहा जणांचे जबाब घेण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून ते परिचरापर्यंत सर्वांचे जबाब घेण्याचे काम सुरू होते.