कोतोली ते कोलोली फाटा रस्त्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:23 AM2021-03-14T04:23:08+5:302021-03-14T04:23:08+5:30
‘लोकमत’चा प्रभाव — नागरिकांतून समाधान लोकमत न्यूज नेटवर्क करंजफेण : पन्हाळा पश्चिम परिसरातील कोतोली ते कोलोली फाटा ...
‘लोकमत’चा प्रभाव — नागरिकांतून समाधान
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण : पन्हाळा पश्चिम परिसरातील कोतोली ते कोलोली फाटा मार्गावरील अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोतोली बाजारपेठ ते कोलोली फाटा हा वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदार मध्यावर सोडून गेला होता. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडून एक बाजू डांबरीकरण अशा स्थितीत अनेक दिवस काम पडून होते. याविषयी ‘लोकमत’मधून वेळोवेळी आवाज उठविण्यात आला होता. याची दखल घेऊन अर्थसंकल्प योजनेतील सात कि.मी. रस्त्यासाठी बी.बी. कारपेटचे जवळपास अडीच कोटींचे काम सध्या पूर्ण करण्यात आल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जीवघेण्या बाजूपट्ट्या
कोतोली ते नांदगाव मार्गावरील रस्त्यावर कारपेटचा मुलामा केल्यामुळे रस्त्याची उंची जागोजागी एक फूट अंतराने वाढली आहे. सध्या ऊस वाहतूक सुरू असल्याने या मार्गावर वाहन चालविणे वाहनधारकांना अडचणीचे होत असून, अपघातात वाढ होऊ लागल्याने तातडीने बाजूपट्ट्या भरण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.
फोटो : कोतोली ते कोलोली फाटा अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.