लाचखोर मंडल अधिकारी गुळवणीसह कोतवालांनाही पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:54+5:302021-09-03T04:23:54+5:30

कोल्हापूर : लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या गडमुडशिंगी सज्जाचे मंडल अधिकारी अर्चना मिलिंद गुळवणी (वय ४७ रा. रेसकोर्स नाका, संभाजीनगर. ...

Kotwala was also remanded in police custody along with bribe-takers | लाचखोर मंडल अधिकारी गुळवणीसह कोतवालांनाही पोलीस कोठडी

लाचखोर मंडल अधिकारी गुळवणीसह कोतवालांनाही पोलीस कोठडी

Next

कोल्हापूर : लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेल्या गडमुडशिंगी सज्जाचे मंडल अधिकारी अर्चना मिलिंद गुळवणी (वय ४७ रा. रेसकोर्स नाका, संभाजीनगर. मूळ गाव- उत्तूर, ता. आजरा), वसगडेचे कोतवाल तात्यासाहेब धनपाल सावंत (वय ३८ रा. वसगडे, ता. करवीर), गडमुडशिंगीचे कोतवाल युवराज कृष्णात वड्ड (वय ३५ रा. मोरे गल्ली, गडमुडशिंगी, ता. करवीर) यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना आज, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेतजमिनीच्या हरकतींच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने दिला म्हणून २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी छापा टाकून अटक केली.

तक्रारदाराने मौजे वसगडे येथे घेतलेल्या जमिनीवर मूळ जमीन मालकांच्या नातेवाइकांनी हरकत घेतली. प्रकरण गडमुडशिंगी सज्जाचे मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांच्याकडे होते. तुमच्या बाजूने निकाल देण्याचे काम आम्ही केले, त्यासाठी कोतवाल सावंत यांनी, कोतवाल वड्ड व अधिकारी गुळवणी यांना २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदारास सांगितले. पैशाच्या तडजोडीला गुळवणी यांनी संमती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी लाच घेताना कोतवाल सावंतला रंगेहाथ पकडले. त्यांना गांधीनगर पोलिसांत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. गुन्ह्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश मोरे करत आहेत.

Web Title: Kotwala was also remanded in police custody along with bribe-takers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.