गांधीनगरात लोकसहभागातून उभारणार कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:27+5:302021-05-29T04:18:27+5:30
गांधीनगर : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे गांधीनगर येथे लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरु झाली असून यासंदर्भात ...
गांधीनगर : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे गांधीनगर येथे लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरु झाली असून यासंदर्भात आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेतली. या कोविड सेंटरसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीस करवीर पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, सरपंच रितू लालवानी उपस्थित होते.
गांधीनगर परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असून याठिकाणी कोविड सेंटरची गरज भासू लागली आहे. बैठकीत लोकसहभागातून कोविड सेंटर सुरू करण्यात बाबत चर्चा झाली. यासाठी वैद्यकीय स्टाफ, सेंटरसाठी लागणारे साहित्य, त्याचे योग्य नियोजन स्थानिक डॉक्टरांचा सहभाग याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यासाठी स्थानिक डॉक्टरांनीही योगदान देण्याचे स्पष्ट केले. निरंकारी भवन येथील सेवा दलानेही रुग्णांसाठी मदतीचे हात पुढे केले. या बैठकीस निरंकारी सेवा संस्थेचे अमरलाल निरंकारी, धीरज टेहलानी, बजरंग रणदिवे, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, डॉ. विधा पाॅल, डॉ. चेतन जुमरानी उपस्थित होते.
फोटो : २८ गांधीनगर बैठक
ओळ-गांधीनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आ. ऋतुराज पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, मीनाक्षी पाटील, सरपंच रितू लालवानी, धीरज टेहलानी. आदी उपस्थित होते. (छाया. बाबासाहेब नेर्ले)