कुरुकली येथील कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:19 AM2021-06-04T04:19:25+5:302021-06-04T04:19:25+5:30
सडोली (खालसा) करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना मात्र आरोग्य विभागाने कुरुकली (ता. करवीर) कोविड ...
सडोली (खालसा)
करवीर तालुक्यातील पश्चिम भागाला कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असताना मात्र आरोग्य विभागाने कुरुकली (ता. करवीर) कोविड सेंटर पूर्ववत न केल्याने रुग्णांना खासगी हॉस्पिटल आधार घ्यावा लागत होता. यामुळे कोविड रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करत वाचा फोडली होती. त्याची दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने कोविड सेंटर पूर्ववत सुरू केले.
पहिल्या लाटेवेळी कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. कोरोनाची रुग्ण संख्येत वाढ होत असून बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत होते. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच व माजी करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी यांनी पाठपुरावा केल्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलून कुरुकली येथील कोविड सेंटर पूर्ववत करण्यात आले असून सर्वसामान्य जनतेला आधार बनत आहे.
चौकट कोविड सेंटर पूर्ववत झाल्यापासून काही सुविधांचा अभाव होता. पंरतु डॉ. रोहित पाटील व राजू सूर्यवंशी यांनी मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनास लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे मदतीचा ओघ सुरू आहे.
फोटो ओळ
कुरुकली (ता. करवीर) येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आले असून म्हाळुंगे येथील ग्रामसेवक जी. डी. पाटील यांनी कोविड रुग्णांसाठी तीस हजारांची रेमडेसिविर इंजेक्शन डॉ. रोहित पाटील यांच्याकडे सुपूर्द करताना. गटविकास अधिकारी जयवंत उगले, राजू सूर्यवंशी, प्रकाश चौगले व इतर.