मुरगूडला उभारलेले कोविड सेंटर जनतेला फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:17+5:302021-06-05T04:18:17+5:30

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित सर पिराजीराव घाटगे गूळ उत्पादक सोसायटी शिंदेवाडी मुरगूड येथे २५ बेडच्या अलगीकरण ...

The Kovid Center set up at Murgud is beneficial to the people | मुरगूडला उभारलेले कोविड सेंटर जनतेला फायदेशीर

मुरगूडला उभारलेले कोविड सेंटर जनतेला फायदेशीर

Next

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित सर पिराजीराव घाटगे गूळ उत्पादक सोसायटी शिंदेवाडी मुरगूड येथे २५ बेडच्या अलगीकरण कक्षाचे उद्घाटन नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबर या सामाजिक कार्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांनी आता पुढे येणे गरजेचे आहे. शिंदेवाडी प्रमाणेच गावोगावी कोविड सेंटर उभारल्यास कोरोनाबाधित रुग्णांवर त्या-त्या ठिकाणी वेळीच उपचार करणे सोयीचे होईल.

या अलगीकरण केंद्रामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नर्सिंग स्टाफची २४ तास सेवा उपलब्ध असणार आहे. रुग्णांना मोफत चहा, नाश्ता व औषधोपचाराची सोय करण्यात येणार आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून एक ऑक्सिजन सिलिंडरसुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे. यावेळी सरपंच रेखा रमेश माळी, डॉ. संजय रामशे, डॉ. सचिन भारमल, अनंत फर्नांडिस, रामभाऊ खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, प्रकाश पाटील, रणजीत पाटील, अमर चौगुले, सुशांत मांगोरे, विजय राजिगरे, राहुल खराडे, विष्णू मोरबाळे, विजय गोधडे, प्रवीण चौगुले, राहुल मुरगूडकर, आक्का वंदूरे, छाया शिंदे आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळ :- शिंदेवाडी, मुरगूड, ता. कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित सरपिराजीराव घाटगे गूळ उत्पादक सोसायटीत कोविड अलगीकरण कक्षाचे उद्घाटन करताना नवोदिता घाटगे, रणजितसिंह पाटील, सरपंच रेखा माळी, रामभाऊ खराडे आदी.

Web Title: The Kovid Center set up at Murgud is beneficial to the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.