करंजोशी येथे कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:22 AM2021-04-18T04:22:52+5:302021-04-18T04:22:52+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता, करंजोशी येथील अल्फोन्सा शाळेत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची ...
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात कोरोनाची वाढती लोकसंख्या पाहता, करंजोशी येथील अल्फोन्सा शाळेत शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती तालुका वैधकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी दिली.
तालुक्यात ११४२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे सातजणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अल्फोन्सा शाळेत आरोग्य विभागाने शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. सध्या येथे ३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत . येथे एकाचवेळी ५० रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची सोय येथे आहे. सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील यांनी कोविड सेंटरची पाहणी केली. या कोविड सेंटरची जबाबदारी डॉ. रवींद्र कांबळे, डॉ. सुभाष यादव हे पाहात आहेत.