मिणचेतील युवा शक्तीचे कोविड सेंटर रुग्णासाठी आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:15+5:302021-06-25T04:18:15+5:30

पेठवडगाव : मिणचे येथील कोविड केअर सेंटरमध्ये मोफत औषधोपचार, सकस आहार, प्रबोधन, मनोरंजनाच्या माध्यमातून महिन्यात ...

The Kovid Center of Youth Power in Minche is the base for the patient | मिणचेतील युवा शक्तीचे कोविड सेंटर रुग्णासाठी आधार

मिणचेतील युवा शक्तीचे कोविड सेंटर रुग्णासाठी आधार

Next

पेठवडगाव : मिणचे येथील कोविड केअर सेंटरमध्ये मोफत औषधोपचार, सकस आहार, प्रबोधन, मनोरंजनाच्या माध्यमातून महिन्यात १२६ कोरोना रुग्णांनी मात केली. डॉ. सुजित मिणचेकर व युवाशक्ती यांच्या वतीने सुरू झालेले कोविड केअर केंद्र सामान्यांसह कोरोनाग्रस्तांना आधार बनले आहे.

मिणचे, वडगावसह कुंभोज मतदारसंघात सोय व्हावी, यासाठी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी कोविड केअर सेंटर सुरू केले.

येथील एम. एस. यादव हॉलमध्ये ५०बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना मोफत औषधोपचार,चहा, नाष्टा, जेवणाबरोबरच रुग्णांचे मनोरंजनही केले जाते. यामध्ये व्याख्यान , प्रबोधनात्मक मार्गदर्शन , योगासने ,संगीत, भजन , किर्तन आदी उपक्रम राबविण्यात येतात. सकाळी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव हे रुग्णांची चौकशी त्यांना मानसिक आधार देतात. यामुळे कोरोना आजारावर महिन्यात १२५ रुग्ण बरे झाले आहेत. या केंद्रात चाळीस ते पंचेचाळीस रुग्णांची सेवा केली जाते. अत्यावश्यक सेवेसाठी

पाच बेड राखीव ठेवले आहेत.

या कोविड केंद्रामध्ये डॉ. सतीश कोगनोळे, डॉ. हर्षल शिखरे, डॉ. अजिंक्य हक्के व डॉ. गणेश बुटे आदी कार्यरत आहे.

Web Title: The Kovid Center of Youth Power in Minche is the base for the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.