'मनसे'च्या कोविड अलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:18+5:302021-05-29T04:20:18+5:30

गडहिंग्लज : मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या येथील राज ठाकरे कोविड अलगीकरण आरोग्य मंदिराला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून ...

Kovid segregation of MNS | 'मनसे'च्या कोविड अलगीकरण

'मनसे'च्या कोविड अलगीकरण

Next

गडहिंग्लज :

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या येथील राज ठाकरे कोविड अलगीकरण

आरोग्य मंदिराला नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष व 'गोकूळ'चे नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीद मुश्रीफ म्हणाले, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हाभर फाउंडेशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप केले आहे.

यावेळी किरण कदम, सुरेश कोळकी, हारुण सय्यद, उदय परीट, गुंड्या पाटील, महेश सलवादे, रश्मिराज देसाई, संतोष कांबळे, राजू जमादार, दीपक कुराडे, प्रशात शिंदे, तुषार यमगेकर,अमर मांगले, अवधूत रोटे, अक्षय शिंदे, विनायक दोनवडे, अविनाश ताशिलदार, प्रभात साबळे उपस्थित होते. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी आभार मानले.

--

फोटो ओळी-

गडहिंग्लज येथील मनसेच्या कोविड अलगीकरण केंद्राला नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kovid segregation of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.