कोयना, सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंतच धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:33 PM2019-07-24T13:33:53+5:302019-07-24T13:43:56+5:30
कोयना, सह्याद्री आणि हुबळी-मुंबई एक्सप्रेस शुक्रवार (दि. २६) ते दि. ९ आॅगस्ट या कालावधीत केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत. घाटक्षेत्रात काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने या एक्सप्रेसबाबत निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : कोयना, सह्याद्री आणि हुबळी-मुंबई एक्सप्रेस शुक्रवार (दि. २६) ते दि. ९ आॅगस्ट या कालावधीत केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत. घाटक्षेत्रात काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने या एक्सप्रेसबाबत निर्णय घेतला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोयना आणि सह्याद्री एक्सप्रेस मिरज-सातारा-पुणे यामार्गे मुंबईला जाते. हुबळी-मुंबई एक्सप्रेसचा बेळगाव-मिरज-सातारा-पुणे आणि मुंबई असा मार्ग आहे. मात्र, आता मध्य रेल्वेने या एक्सप्रेस दि. ९ आॅगस्टपर्यंत केवळ पुण्यापर्यंत नेण्याचा आणि तेथून या मार्गावर पुन्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची कार्यवाही रेल्वे विभागाकडून शुक्रवारपासून केली जाणार आहे.
कदाचित पुणे-मुंबई मार्गावरील घाटाच्या क्षेत्रात काही काम करावयाचे असल्याने रेल्वे विभागाने पुण्यापर्यंत संबंधित एक्सप्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी मंगळवारी व्यक्त केली.