तंबाखू नियंत्रण निबंध स्पर्धेत क्रांती शिंदे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:20+5:302021-02-06T04:45:20+5:30

कोल्हापूर : तंबाखू विरोधी जनजागृती करण्यासाठी तंबाखू नियंत्रण विषयावर टाटा मेमोरियल सेंटर, सेंटर फॉर कॅन्सर इपीडेमियॉलॉजी मुंबई व राष्ट्रीय ...

Kranti Shinde first in Tobacco Control Essay Competition | तंबाखू नियंत्रण निबंध स्पर्धेत क्रांती शिंदे प्रथम

तंबाखू नियंत्रण निबंध स्पर्धेत क्रांती शिंदे प्रथम

Next

कोल्हापूर : तंबाखू विरोधी जनजागृती करण्यासाठी तंबाखू नियंत्रण विषयावर टाटा मेमोरियल सेंटर, सेंटर फॉर कॅन्सर इपीडेमियॉलॉजी मुंबई व राष्ट्रीय तंबाखू मुक्ती सेवा केंद्राच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत कोल्हापूरच्या क्रांती रंगराव शिंदे (रा.पोर्ले, ता. पन्हाळा) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. शिंदे या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तंबाखू नियंत्रण विभागाकडे सेवेत आहेत.

जळगावचे विजय गोसावी व मुंबईच्या भाग्यश्री टिल्लू, व चंद्रपूरचे धनराज दुर्योधन यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, चार हजार, तीन हजार, एक हजार रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह १४१ स्पर्धक सहभागी झाले होते.

---

फोटो नं ०५०२२०२१-कोल-क्रांती शिंदे (निबंध स्पर्धा)

--

Web Title: Kranti Shinde first in Tobacco Control Essay Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.