क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:18 PM2020-01-03T18:18:02+5:302020-01-03T18:19:18+5:30
क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
कोल्हापूर : क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी. तिच खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनविले. याच क्रांतीज्योतीने स्त्रियांना शिक्षीत केले. खचलेल्या स्त्रियांना शिक्षणाच्या मार्गातून पुढे आणले. सर्वच क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत.
ज्या महिला अधिकाऱ्यांची पदोन्नती होत आहे, अशा महिला अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर मंडल अधिकारी म्हणून सक्षमपणे काम करावे आणि आपली स्वतंत्र ओळख निर्माण करावी. हीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यासाठी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा.
यावेळी अव्वल कारकून अश्विनी कारंडे, सामान्य प्रशासन शाखेचे संभाजी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, तहसिलदार अर्चना शेटे, रंजना बिचकर, सुनिता नेर्लीकर, सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, नायब तहसिलदार अर्चना कुलकर्णी आदी उपस्थिती होते.