भाटणवाडी येथे कृषिकन्येचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:39+5:302021-08-24T04:29:39+5:30
गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक तण नियंत्रण, खते देण्याच्या नव्या पध्दती, गोठा पध्दत, जनावरांचे संगोपन व स्वच्छता, कर्ज मागणीचा ...
गावातील शेतकऱ्यांना माती परीक्षण, एकात्मिक तण नियंत्रण, खते देण्याच्या नव्या पध्दती, गोठा पध्दत, जनावरांचे संगोपन व स्वच्छता, कर्ज मागणीचा अर्ज कसा करावा, विविध किडीचे व्यवस्थापन, मोबाइलद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञान, फळझाडाची कलमे बांधणी, दुग्ध पदार्थांची निर्मिती आदि विषयावरील प्रात्यक्षिके करून दाखविली. यावेळी शेतकरी महादेव पाटील, कृष्णात पाटील, रघुनाथ पाटील, सुभाष पाटील, जयसिंग पाटील, सविता पाटील, संगीता पाटील, मनीषा पाटील, सुवर्णा पाटील उपस्थित होते.
कृषिकन्या अमृता पाटील यांना सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. आर. जुकटे, समन्वयक डॉ. धनंजय नावडकर, डॉ आनंद चवई आदीचे मार्गदर्शन लाभले.