कृष्णराजची भव्य मिरवणूक---‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:47 AM2017-08-31T00:47:36+5:302017-08-31T00:50:32+5:30

कोल्हापूर : इंग्लंडमध्ये झालेल्या बी.आर.डी.सी. ‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या कृष्णराज धनंजय महाडिकचे बुधवारी सकाळी कोल्हापुरात आगमन होताच कोल्हापुरी थाटात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

 Krishnaraj's grand procession - 'British Formula Three' first | कृष्णराजची भव्य मिरवणूक---‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये प्रथम

कृष्णराजची भव्य मिरवणूक---‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये प्रथम

googlenewsNext
ठळक मुद्दे भारतासह कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करायचे आहे. कोल्हापुरी थाटात स्वागत :कोल्हापूरकरांच्या पाठबळामुळे या गोष्टी शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इंग्लंडमध्ये झालेल्या बी.आर.डी.सी. ‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या कृष्णराज धनंजय महाडिकचे बुधवारी सकाळी कोल्हापुरात आगमन होताच कोल्हापुरी थाटात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ताराराणी चौक येथे महापौर हसिना फरास, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शाहू महाराज छत्रपती यांनी ‘कृष्णराज’चे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या बी.आर.डी.सी. ‘ब्रिटिश फॉर्म्युला थ्री’ स्पर्धेत कृष्णराजने सहभाग घेत प्रथम क्रमांक पटकाविला. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयन याने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर कृष्णराजच्या रूपाने विजेतेपद भारताच्या रेसरला मिळाले.
कोल्हापूरचा झेंडा अटकेपार नेणाºया कृष्णराजचे कोल्हापुरात आगमन होताच ताराराणी चौकात क्रीडाप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करून जंगी स्वागत केले.

‘कृृष्णराज’ने छत्रपती ‘ताराराणीं’च्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर त्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभिषण पाटील, ए. वाय. पाटील, रामराजे कुपेकर, अरुधंती महाडिक, आर. के. पोवार, नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, मिलिंद धोंड, संग्राम निकम, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
झांजपथकाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला. व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक मार्गे रॅली शिवाजी चौकात आली. रॅलीच्या मार्गावर फटाक्यांची आतषबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

रॅलीमार्गात विविध संघटनांकडून स्वागत
रॅलीवेळी मध्यवर्ती बसस्थानक येथील रिक्षा स्टँड, ट्रॅव्हल्स् असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा बैतुल माल कमिटी आणि मुस्लिम बांधव, खाटीक समाज यांच्यासह विविध मंडळांनी कृष्णराज महाडिकचे स्वागत करून त्याला शुभेच्छा दिल्या. ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात आल्यावर आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांनी कृष्णराजचे स्वागत केले. दरम्यान, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही कृष्णराजला पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.

विजयाचे सगळे श्रेय माझ्या आई व वडिलांना देतो. मला रेसिंगमध्ये अजूनही खूप शिकायचे आहे. ‘फॉर्म्युला वन’मध्ये मला आता पदक मिळवून भारतासह कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करायचे आहे.
- कृष्णराज महाडिक

माझे वडील व मी आम्ही दोघेही पैलवान होतो, त्यामुळे आमच्या मुलांनीही पैलवान व्हावे, अशी माझी इच्छा होती. मात्र, कृष्णराजने आपले वेगळे क्षेत्र निवडून त्यांने भारतासह कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. कोल्हापूरकरांच्या पाठबळामुळे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. - खासदार धनंजय महाडिक
(कृष्णराजचे वडील)

Web Title:  Krishnaraj's grand procession - 'British Formula Three' first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.