केएसए फुटबॉल लिग: शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ, झुंजार क्लब संघांची प्रतिस्पर्धी संघावर मात

By संदीप आडनाईक | Published: December 19, 2023 07:25 PM2023-12-19T19:25:41+5:302023-12-19T19:26:06+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजीत शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये शिवाजी तरुण ...

KSA Football League: Shivaji Tarun Mandal, Sandhyamath, Zunjar Club teams defeated rival teams | केएसए फुटबॉल लिग: शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ, झुंजार क्लब संघांची प्रतिस्पर्धी संघावर मात

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजीत शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लिग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये शिवाजी तरुण मंडळ, संध्यामठ आणि झुंजार क्लब संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.

शाहू मैदानावर मंगळवारी तिसरा सामना शिवाजी विरुद्ध सयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळवण्यात आला. शिवाजीच्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक खेळ केला. सामन्यात तिसऱ्या मिनीटाला शिवाजी मंडळाच्या संकेत अनिल साळोखेच्या पासवर संकेत नितिन साळोखे याने गोल नोंदवला. सामन्याच्या १९ व्या मिनीटाला लहान डी मध्ये शिवाजीच्या विशाल पाटील याने चेंडू हाताने हातळल्यामुळे जुना बुधवारला पेनल्टी मिळाली. या संधीचे सोने करत सोनम शेरफा याने गोल केला आणि बरोबरी साधली. 

पण ३९ मिनीटाला परत संकेत अनिल साळोखेने दिलेल्या पासवर संतेक नितीन साळोखे यानेच दुसरा गोल केला. पुर्वांधात शिवाजी संघ २-१ असे आघाडीवर राहीला. उत्तरार्धा ४८ व्या मिनीटाला शिवाजीच्या संकेत साळोखेने वैयक्तीक गोल करत संघाची पकड मजबूत केली. ६५ व्या मिनीटाला शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेने मैदानी गोल करत ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटी सामना शिवाजीने ४-१ असा सहज जिंकला. 

जुना बुधवारच्या थापा याला रेड कार्ड

या सामन्यात पुर्वांधामध्ये शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेला धोकादायकपणे अडवल्याबद्धल जुना बुधवारच्या नितेश थापा याला रेड कार्ड देण्यात आले. 

कोल्हापूर पोलीस, सोल्जर्स पराभूत

दरम्यान, सकाळी झालेला संध्यामठ विरुद्ध कोल्हापूर पोलीस यांच्यातील पहिला सामना संध्यामठने ६-१ असा एकतर्फी जिंकला. संध्यामठकडून कपिल शिंदे याने १६ व २४ व्या मिनीटाला, हर्ष जरगने ३६, सिद्धेश साठे याने ६४, कपिल शिंदे ६१, यश जांभळे ८० व्या मिनीटाला गोल केले. पोलीसकडून आदित्य लाड याने एकमेव ५० व्या मिनीटाला गोल केला. दुपारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात झुंजार क्लब विरुद्ध सोल्जर्स सामना टायब्रेकरवर झुंजारने ५ विरुद्ध ४ गोलफरकाने जिंकला.

Web Title: KSA Football League: Shivaji Tarun Mandal, Sandhyamath, Zunjar Club teams defeated rival teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.