क्षीरसागर यांनी आमदार निधी खर्च केलेला ‘तो’ रस्ता दाखवावा : सत्यजित कदम यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 11:33 AM2018-11-29T11:33:51+5:302018-11-29T11:36:56+5:30

कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये,

Kshirsagar should show the road he has spent on funding: Satyajit Kadam's challenge | क्षीरसागर यांनी आमदार निधी खर्च केलेला ‘तो’ रस्ता दाखवावा : सत्यजित कदम यांचे आव्हान

क्षीरसागर यांनी आमदार निधी खर्च केलेला ‘तो’ रस्ता दाखवावा : सत्यजित कदम यांचे आव्हान

Next
ठळक मुद्देविषयांतर करून लक्ष विचलित नको; प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचणारआमदार क्षीरसागर यांनी रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयावर बोलून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.

कोल्हापूर : कदमवाडी येथे सुमारे ७५ लाख रुपये खर्च पडलेला आमदार निधीतील रस्ता आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष जागेवर दाखवावा, या प्रकरणापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ‘त्या’ निधी व रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलू नये, असे आव्हान महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम आणि माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच या रस्ते प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचून सत्य बाहेर काढणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

महापालिकेच्या सोमवारी (दि. २६) झालेल्या सर्वसाधारण सभेत खासगी लेआऊट विकसित करताना आमदार राजेश क्षीरसागर यांचा सुमारे ७५ लाख रुपये आमदार निधी कसा काय खर्च केला, याची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी आक्षेप घेत भाजपने सत्यजित कदम यांचा विधानसभा उमेदवारीचा पत्ता कट केल्याने त्यांनी आपल्यावर वैफल्यातून बिनबुडाचे आरोप केल्याचे प्रसिद्धीस दिले होते. त्याबाबत कदम यांनी बुधवारी प्रत्यक्ष ‘त्या’ वादग्रस्त जागेवर जाऊनच पत्रकार परिषद घेतली.

सत्यजित कदम व सुनील कदम म्हणाले, कदमवाडी येथील रि. स. नं. २१६ या जागेमध्ये वैयक्तिक लेआऊट असताना त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून सुमारे ७५ लाख रुपये खर्च करून गटर्स, रस्ते करण्यासाठी खर्च केले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामधून त्याचे बिलही ठेकेदारामार्फत उचलण्यात आले आहे; पण गेल्याच महिन्यात हेच रस्ते व गटर्स जेसीबी, पोकलॅनच्या साहाय्याने विकसकाने पूर्णत: उद्ध्वस्त केले. हे रस्ते मीच खर्च केल्यामुळे मी ते उखडून काढल्याचे त्याच विकसकाने सांगितले. विशेष म्हणजे, त्या विकसकाने या रस्ते, गटारीच्या कामात खर्च केल्याच्या पावत्या टॅक्स कार्यालयात दाखविल्या आहेत. मग आमदार क्षीरसागर यांनी निधी कोठे वापरला, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.

एकाच विकासकामासाठी विकसक आणि आमदार निधी कसा खर्च दाखविला आहे? याबाबत प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच आमदार क्षीरसागर यांनी कदमवाडी या भागात गेल्या आठ वर्षांत रस्त्यासाठी किती व कोठे खर्च केला याची सविस्तर माहिती द्यावी. त्यामुळे आमदार क्षीरसागर यांनी रस्त्याव्यतिरिक्त इतर विषयावर बोलून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू नये, असेही आव्हान त्यांनी यावेळी केले.

महापालिकेचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र
ते म्हणाले, आमदार निधीतील विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले होते. या कामासाठी महापालिकेमधून शहर अभियंता यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ही घेतले आहे.
 

Web Title: Kshirsagar should show the road he has spent on funding: Satyajit Kadam's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.