कुंभी कासारी साखर कारखान्याची संपूर्ण एफआरपी अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:18+5:302021-06-26T04:17:18+5:30

यावेळी बोलताना अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले कुंभी कासारी साखर कारखाना हंगाम २०२१ मध्ये ५ लाख ५० हजार ६१५ मे. ...

Kumbhi Kasari paid the entire FRP of the sugar factory | कुंभी कासारी साखर कारखान्याची संपूर्ण एफआरपी अदा

कुंभी कासारी साखर कारखान्याची संपूर्ण एफआरपी अदा

Next

यावेळी बोलताना अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले कुंभी कासारी साखर कारखाना हंगाम २०२१ मध्ये ५ लाख ५० हजार ६१५ मे. टन उसाचे गाळप केले आहे. १२.६९ टक्के सरासरी साखर उताऱ्यासह यावर्षी ५ लाख ९८ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कारखान्यांनी गाळप केलेल्या उसाची एफआरपी १७१ कोटी ७३ लाख ६९ हजार ८१६ रुपये होत आहे. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ही संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील हा उच्चांकी ऊस दर आहे असे अध्यक्ष नरके यांनी सांगितले.

सलग दोन वर्षे अतिरिक्त साखर उत्पादन, कोरोना महामारी यामुळे साखरेला उत्पादन खर्चाएवढाही दर मिळत आहे. साखरेच्या हमी भावाप्रमाणे दर मिळत नसल्याने गोडाऊन मध्ये यावर्षीची साखर शिल्लक आहे. याचा परिणाम आर्थिककोंडी होत असल्याने साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. त्यातच सध्या उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी राजस्थान, हरयाणा, गुजरात, दिल्ली या राज्यातील बाजारपेठ काबीज केली आहे. पण ऊस उत्पादकांचे हीत समोर ठेवून उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कुंभी कासारीने कायम ठेवल्याचे सांगितले.

हंगाम २०२१/२२ साठी सहा लाख मे. टन उसाचे गाळप उद्दिष्ट ठेवले आहे. तरी कार्यक्षेत्रातील सभासद बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस कुंभीला पुरवठा करावा, असे आवाहन अध्यक्ष नरके यांनी केले आहे.

Web Title: Kumbhi Kasari paid the entire FRP of the sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.