कुंभी-कासारी प्रतिष्ठानच्या मुलींचे राष्ट्रीय नेमबाजीत यश
By admin | Published: January 8, 2016 12:46 AM2016-01-08T00:46:38+5:302016-01-08T00:56:44+5:30
नेमबाजी स्पर्धेतील विविध प्रकारांत १७० खेळाडंूनी तालुका, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले आहे.
कोल्हापूर : इंदुर (मध्य प्रदेश) येथील डेली कॉलेजमध्ये झालेल्या ६१ व्या शालेय राष्ट्रीय सांघिक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संघातून प्रतिनिधित्व करीत साक्षी कुंभार, राजनंदिनी मोरे, राबिआ काकतीकर या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले.
यामध्ये साक्षी शिवाजी कुंभार (कुडित्रे, ता.करवीर) हिने एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकावले. तसेच राजनंदिनी संदीप मोरे हिने ओपन साईट एअर रायफल प्रकारात सांघिक सुवर्णपदक, तर राबिआ अकबर काकतीकर हिने एअर पिस्तूल प्रकारात सांघिक कांस्यपदक मिळविले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थिनींनी कुंभी-कासारी प्रतिष्ठान, कुडित्रे, ता. करवीर येथील शूटिंग रेंजमध्ये कसून सराव केला होता. त्यांना राष्ट्रीय प्रशिक्षक युवराज चौगले मार्गदर्शनकरीत आहेत. आतापर्यंत कुंभी कासारी प्रतिष्ठान शूटिंग रेंजमध्ये सराव करून नेमबाजी स्पर्धेतील विविध प्रकारांत १७० खेळाडंूनी तालुका, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले आहे. या सर्व खेळाडूंना आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रोत्साहन लाभले.