कुंभोजच्या शेतकऱ्यांनी माळरानावर मळे फुलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:53+5:302020-12-06T04:25:53+5:30
कुंभोज : शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाची कास धरून परिश्रमाच्या जोरावर वारणा नदीकाठी कुंभोजच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागायती शेतीबरोबरच माळावरही मळे ...
कुंभोज : शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाची कास धरून परिश्रमाच्या जोरावर वारणा नदीकाठी कुंभोजच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी बागायती शेतीबरोबरच माळावरही मळे फुलविले आहेत, असे गौरवोद्गार माजी आमदार अमल महाडिक यांनी काढले. कुंभोज येथील शिवार संवाद भेटीदरम्यान ते शेतकऱ्यांशी बोलत होते.
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखाना तसेच माजी आमदार महाडिक यांच्या संकल्पनेतून शिवार संवाद भेटीच्या निमित्ताने कुंभोज येथील विविध प्रयोगशील शेतकऱ्यांच्या ऊसशेतीस भेट देऊन, शेतकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक केले. सुनील भोकरे, डॉ. बच्चाप्पा यांच्या मुक्त गोठ्यास भेट दिली. दुर्लक्षित कुंभोज-वाठार रस्त्याची पाहणी करून पाठपुरावा करण्याबाबत उपस्थितांना आश्वासन दिले.
यावेळी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक बिरदेव तानगे, कोंडिबा भानुसे, सदाशिव कुलकर्णी, अमित साजणकर, प्रमोद साजणकर, विश्वजित माने, कुंतीनाथ चौगुले तसेच शेतकरी उपस्थित होते.