कुंभोजच्या युवा कलाकाराचे मुद्राचित्र ठरले अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:22 AM2021-03-24T04:22:18+5:302021-03-24T04:22:18+5:30

कुंभोज : दिल्ली येथे घेण्यात ...

Kumbhoja's young artist's portrait became the top | कुंभोजच्या युवा कलाकाराचे मुद्राचित्र ठरले अव्वल

कुंभोजच्या युवा कलाकाराचे मुद्राचित्र ठरले अव्वल

Next

कुंभोज : दिल्ली येथे घेण्यात आलेल्या ‘ इन्सेप्शन आर्ट ग्रांट’ या स्पर्धेत कुंभोज (ता. हातकणंगले) येथील कुमार पांडुरंग मिसाळ या युवा कलाकाराने रेखाटलेले मुद्राचित्र अव्वल ठरले असून, त्यासाठी त्याला पन्नास हजार रुपयांचे विशेष बक्षीस मिळाले.

संपूर्ण देशातून आलेल्या एक हजार पाचशे कलाकृतींमधून केवळ तेवीस कलाकारांच्या कलाकृती निवडल्या. अंतिमत: दोन कलाकारांच्या कलाकृती बक्षीसपात्र ठरल्या. यामध्ये कुमार मिसाळ याचे मुद्राचित्र अव्वल ठरले. सध्या त्याच्या कलाकृतींचे प्रदर्शन दिल्लीमधील स्टेअर आर्ट गॅलरी येथे सुरू आहे. कुमारने मुद्रा चित्रासाठी शेतामधील टाकाऊ पदार्थांपासून बनविलेला पृष्ठभाग हे त्याच्या कलाकृतींचे खास वैशिष्ट्य असून, त्या पृष्ठभागावर शेतकऱ्यांच्या विविध व्यथांच्या साकारलेल्या मुद्राचित्रणाची निवड झाली आहे. त्याने मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट काॅलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले असून, त्याच्या अनेक कलाकृती देश-विदेशातील प्रदर्शनात तसेच विविध स्पर्धेत कौतुकास पात्र ठरल्या आहेत.

फोटो ओळी-१)

कुंभोज (ता. हातकणंगले) येथील कुमार मिसाळ या युवा कलाकाराने मुद्राचित्रणातून साकारलेले शेतकऱ्यांचे जीवन व व्यथा.

फोटो-२)

कुमार मिसाळ

Web Title: Kumbhoja's young artist's portrait became the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.