कुंभी कारखाना निवडणूक: जसं ठरलंय तसंच झालंय; आमदार सतेज पाटलांच्या पाठबळाची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:33 PM2023-02-15T12:33:38+5:302023-02-15T12:34:03+5:30

सांगरूळ, कोगे, पाडळी खुर्दने दिली नरकेंना साथ

Kumbi Factory Election: Strong discussion of MLA Satej Patil support | कुंभी कारखाना निवडणूक: जसं ठरलंय तसंच झालंय; आमदार सतेज पाटलांच्या पाठबळाची जोरदार चर्चा

कुंभी कारखाना निवडणूक: जसं ठरलंय तसंच झालंय; आमदार सतेज पाटलांच्या पाठबळाची जोरदार चर्चा

googlenewsNext

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांनी नरके पॅनलला पाठिंबा दिल्यानंतर कार्यक्षेत्रात ‘आमचं ठरलयं...’ ही टॅगलाइन फिरत होती. निकालामध्येही त्याचे पडसाद दिसत होते. गट क्रमांक १, ३ व गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांचा प्रभाव आहे. येथे विरोधी शाहू आघाडीचे मताधिक्य कमी करत नरके पॅनलला निर्णायक आघाडी मिळवण्यात यश आले. त्यामुळे निकालानंतर ‘जसं ठरलंय तसंच झालंय’, ही टॅगलाइन सोशल मीडियावर जोरदार फिरत होती.

विरोधकांनी सुरुवातीपासूनच चंद्रदीप नरके यांना एकाकी पाडण्याचे नियोजन केले होते. त्यात अरुण नरके यांनीही चंद्रदीप यांचा हात सोडल्याने त्यांच्या अडचणी वाढणार की काय, असे वाटत होते. मात्र सतेज पाटील यांनी उघड भूमिका घेत त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा सुरू आहे.

सांगरूळ, कोगे, पाडळी खुर्दने दिली नरकेंना साथ

मतदान अधिक व विरोधी पॅनलचे नेतृत्व सांगरूळमधील होते, तरीही पॅनल टु पॅनल मतदानामध्ये नरके पॅनल सरस ठरले. त्याचबरोबर कोगे, पाडळी खुर्द, वाकरे, कसबा बीड, सडोली दुमाला या गावांनी चंद्रदीप नरकेंना साथ दिल्याने पहिल्या फेरीतील मताधिक्य कमी करत विरोधकांवर निर्णायक आघाडी घेतली.

घसरलेल्या मताधिक्याने चिंता वाढवली

पहिल्या फेरीत अपेक्षित मताधिक्य न मिळाल्याने विरोधकांच्या चेहऱ्यावर चिंता वाढली होती. तर चंद्रदीप नरके समर्थकांना निवडणूक एकतर्फी मारू शकतो याचा अंंदाज आला होता. दुसऱ्या फेरीनंतर विरोधकांना निकालाचा अंदाज आला होता.

बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्यापासून विरोधकांना रोखले

सांगरूळ व कुडित्रे गटात विरोधकांनी ताकद पणास लावली होती. कोपार्डे व तीन-चार गावे वगळता इतर गावांनी नरके पॅनलला चांगली साथ दिल्याने विरोधकांच्या बालेकिल्ल्यात मोठ्या मताधिक्यापासून रोखण्यात नरकेंना यश मिळाले. या परिसरातून किमान दीड ते दोन हजारांचे मताधिक्य राहील, असा विश्वास विरोधकांना हाेता.

Web Title: Kumbi Factory Election: Strong discussion of MLA Satej Patil support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.