यड्राव सरपंचपदी कुणालसिंह नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:30 AM2021-02-27T04:30:51+5:302021-02-27T04:30:51+5:30
यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, तर उपसरपंचपदी प्राची हिंगे यांची निवड झाली. राज्यमंत्री डॉ. राजेंद्र ...
यड्राव : यड्राव (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी कुणालसिंह नाईक-निंबाळकर, तर उपसरपंचपदी प्राची हिंगे यांची निवड झाली. राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व सत्येंद्रराजे नाईक-निंबाळकर यांच्या महाविकास आघाडीची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे.
सरपंच पदासाठी महाविकास आघाडीकडून निंबाळकर व उपसरपंच पदासाठी हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर विरोधी श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीकडून सरपंच पदासाठी प्रदीप पाटील व उपसरपंच पदासाठी राधिका तासगावे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. विरोधी आघाडीने गुप्त मतदान घेण्याची मागणी केल्याने मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाविकास आघाडीला नऊ, तर श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीला आठ मते मिळाली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसो टोणे यांनी सरपंचपदी निंबाळकर व उपसरपंचपदी हिंगे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी तलाठी नितीन कांबळे, स्मिता शेळके यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
फोटो - २६०२२०२१-जेएवाय-०१-कुणालसिंह नाईक-निंबाळकर, प्राची हिंगे