कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:34+5:302021-09-02T04:50:34+5:30

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती ...

In Kurundwad, the administration needs a compromise between the protesters | कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

Next

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ

गणपती कोळी : कुरुंदवाड

शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती आणि पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. शहराचा विकास साधण्याचा प्रशासन आणि आंदोलक दोघांचाही उद्देश एकच आहे. मात्र एकमेकांबाबत गैरसमज, स्वाभिमान आणि हटवादी भूमिका यामुळे दोघांमधील ताणलेले संबंध शहराच्या दृष्टीने हितावह नाहीत. त्यामुळे दोघांनाही दोन पावले मागे घेऊन प्रश्नांची चर्चेने सोडवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा वैयक्तिक राग, द्वेशामुळे वैयक्तिकतेबरोबर शहराचे नुकसान अटळ आहे.

शहरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्त्यांचा प्रश्न, रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना, अतिक्रमण नियमितीकरण यासह नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कृती समिती आंदोलन करत आहेत.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलकांचा आदर राखत चर्चेद्वारे प्रश्न समजून घेण्याची तसेच प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही केली, हे सांगण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याउलट वारंवार आंदोलन होत असल्याचे कारण दाखवत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच जमावबंदी आदेश मोडल्याचे कारण सांगत आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने वाद अधिक निर्माण झाला आहे. तर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन यशस्वी केल्याने तात्त्विक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक दोषावर गेले आहे. त्यामुळे वाद चिघळत आहे.

प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीबरोबर आंदोलकांनीही अधिकाऱ्यांचा सन्मान राखत त्यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ आणि सहकार्य करण्याची गरज असते. मात्र शहरात दोन्ही बाजूकडून नेमका याच गोष्टीचा अभाव असल्याने व स्वाभिमान जागृत झाल्याने मुख्याधिकारी आणि आंदोलक दोघांनीही प्रतिष्ठा केल्याने दोहोमधील संवाद संपून संबंध ताणले गेले आहेत. दोघांनीही एकमेकांचा वैयक्तिक राग, द्वेश करत टोकाची भूमिका घेतली आहे. यातून काहीअंशी वैयक्तिक जीवनात नुकसान तर होऊ शकतेच शिवाय शहरासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांतील मतभेद, राग, द्वेष संपवून दुरावलेले संबंध आणि संवाद सुरू करण्याची गरज आहे.

Web Title: In Kurundwad, the administration needs a compromise between the protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.