कुरुंदवाडच्या गणेशला कांस्य

By admin | Published: July 26, 2014 12:50 AM2014-07-26T00:50:21+5:302014-07-26T00:50:47+5:30

राष्ट्रकुल स्पर्धा : वेटलिफ्टिंगमध्ये ५६ किलो वजनगटात पदक

Kurundwad Ganeshala Bronze | कुरुंदवाडच्या गणेशला कांस्य

कुरुंदवाडच्या गणेशला कांस्य

Next

ग्लास्गो : कुरुंदवाडच्या गणेश चंद्रकांत माळी याने आज, शुक्रवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘कांस्यपदक’ पटकावून सातासमुद्रापार आपल्या यशाचा डंका पिटला. वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गणेशने ५६ किलो वजनगटात हे पदक मिळविले. ही कामगिरी करताना त्याने स्नॅच प्रकारात १११ किलो, क्लीन अँड जर्क प्रकारात १३३ किलो असे एकूण २४४ किलो वजन उचलले.
गणेशचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. या गटातील सुवर्णपदक भारताच्याच सुखेन डे याने पटकाविले. मलेशियाच्या जुलेहल्मी एमडी पिसोल याला दुसरे स्थान मिळाले. या गटात एकूण १५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गणेश हा वयाच्या १२ व्या वर्षापासून कुरुंदवाड येथील हर्क्युलस जिममध्ये सराव करतो. तो भारतीय वायुदलात नोकरीला आहे.
दुसऱ्यांची घरे-दारे रंगवून पेंटर म्हणून आणि दुसऱ्यांच्या शेतात बांध खुरपून मी व माझ्या पत्नीने गणेशला घडविले. गणेशने घराण्याचे नाव उज्ज्वल केले. आज जागतिक खेळाडू गणेश माळी यांचे आई-वडील म्हणवून घेताना आकाश ठेंगणे झाले आहे. गणेशने असाच देशाचा नावलौकिक वाढवावा, त्यासाठी आम्ही आणखी कष्ट घेऊ. - चंद्रकांत माळी व अनिता माळी

Web Title: Kurundwad Ganeshala Bronze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.