कुरुंदवाडमध्ये हालगी वाजवून कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:39+5:302021-03-17T04:24:39+5:30

मार्च महिना संपत आला तरी पालिकेची कर वसुलीला काही मिळकतधारकांचा वसुलीला प्रतिसाद देत नसल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ...

In Kurundwad, tax was collected by playing Halgi | कुरुंदवाडमध्ये हालगी वाजवून कर वसुली

कुरुंदवाडमध्ये हालगी वाजवून कर वसुली

Next

मार्च महिना संपत आला तरी पालिकेची कर वसुलीला काही मिळकतधारकांचा वसुलीला प्रतिसाद देत नसल्याने मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी गांधीगिरी पद्धतीने कर वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मिळकतधारकांचे कर थकीत आहेत. शिवाय वसुली पथकाला प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांच्या दारात जाऊन हालगी वाजवली जात आहे. त्यामुळे मिळकतधारक कराची वसुली देत आहेत. कर वसुलीसाठी या अभिनव उपक्रमाची शहरात चर्चा रंगली असलीतरी थकबाकीदार मिळकतधारक या वसुलीची चांगलीच धास्ती घेतली आहेत.

पथकात अनिकेत भोसले, निशिकांत ढाले, अजित दिपंकर, आयुब मतवाल, शशिकांत कडाळे, गिरीधर मधाळे आदी सहभागी झाले होते.

फोटो - १६०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील पालिका चौकातील मिळकतधारकांच्या दारात हालगी वाजवून कर वसुली पथकाकडून वसुली सुरु आहे.

Web Title: In Kurundwad, tax was collected by playing Halgi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.