कुसुमाग्रजांनी मराठी भाषेचा स्वाभिमान जागवला : डाॅ. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:27 AM2021-03-01T04:27:16+5:302021-03-01T04:27:16+5:30
कोल्हापूर : मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीचा स्वाभिमान जनमनात जागवण्याचे काम कुसुमाग्रजांनी केले. राष्ट्रीय पातळीवर सत्य, शिव आणि सौंदर्याचा ...
कोल्हापूर : मराठी भाषा आणि साहित्य संस्कृतीचा स्वाभिमान जनमनात जागवण्याचे काम कुसुमाग्रजांनी केले. राष्ट्रीय पातळीवर सत्य, शिव आणि सौंदर्याचा पुरस्कार त्यांनीच केल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केले.
न्यू कॉलेजमध्ये मराठी विभागाच्यावतीने मराठी राजभाषा दिनाानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. पाटील यांच्याहस्ते केले. प्रा. चैत्रा राजाज्ञा, प्रा. जी. आर. पाटील, प्रा. संगीता सूर्यवंशी, डॉ. एम. ए. नायकवडी आदी उपस्थित हाेते. उज्ज्वला चेचर यांनी प्रास्ताविक केले. ज्योती खवरे यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
न्यू कॉलेजमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. चैत्रा राजाज्ञा, प्रा. जी. आर. पाटील उपस्थित होते.
(फोटो-२८०२२०२१-कोल-न्यू कॉलेज)