‘श्रमिक ओळखपत्र’ असंघटित कामगारांना फायदेशीर : आनंदराव साने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:26+5:302021-09-02T04:50:26+5:30
यड्राव : केंद्र शासनाच्या वतीने ‘श्रमिक ओळखपत्र’ ही योजना असंघटित कामगार वर्गासाठी आवश्यक व फायदेशीर आहे. या योजनेमुळे केंद्र ...
यड्राव : केंद्र शासनाच्या वतीने ‘श्रमिक ओळखपत्र’ ही योजना असंघटित कामगार वर्गासाठी आवश्यक व फायदेशीर आहे. या योजनेमुळे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचे लाभ घेता येतात. यातील सहभागी सदस्यांची नोंद शासनाकडे होणार आहे. तरी असंघटित कामगारांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन भाजप कोल्हापूर जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष आनंदराव साने यांनी केले.
यड्राव येथे भाजप कामगार आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या कामगार बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्र शासनाकडून कामगारांना मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
केंद्र शासनाने देशातील घरेलू महिला कामगार, बांधकाम कामगार, शेतमजूर, सुरक्षारक्षक, सलून चालक-मालक, भाजीविक्रेते यांच्यासह बारा बलुतेदार व्यावसायिक असंघटित कामगारांसाठी श्रमिक ओळखपत्र योजना आणली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्यांची नोंद शासनाकडे होणार आहे. या योजनेमुळे शासकीय योजनांचा लाभही कार्डधारकांना येणार आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत ही या कार्डधारकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी परशराम कत्ती, राजकुमार जांभळे, संजय असगेकर, राजू आवटी, सचिन माने, जावेद शेख, सारंग कत्ती यांच्यासह कामगार उपस्थित होते.
फोटो - ३१०८२०२१-जेएवाय-०२-आनंदराव साने