कोल्हापूर: शहापुरात कामगाराचा खून, मृतदेह टाकला ओढ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 05:05 PM2022-10-03T17:05:09+5:302022-10-03T17:05:31+5:30

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

Laborer killed in Shahapur Kolhapur district, body dumped in stream | कोल्हापूर: शहापुरात कामगाराचा खून, मृतदेह टाकला ओढ्यात

कोल्हापूर: शहापुरात कामगाराचा खून, मृतदेह टाकला ओढ्यात

Next

अतुल आंबी

इचलकरंजी : यड्राव फाटा ते पंचगंगा साखर कारखाना या मार्गावरील शहापूर ओढ्यालगत एका तरुणाचा खून करण्यात आला. सुरज बबन कांबळे (वय २५, रा. रेणुकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. त्याच्या तोंडावर आणि डोक्यात वार करण्यात आले आहेत. ही घटना आज, सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

सोमवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक निनावी फोन आला. त्यातून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता खून झाल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांनी सूरजच्या तोंडावर व डोक्यावर वार करून मृतदेह ओढ्यात टाकला आहे. सुरज हा वहीफणी कामगार असल्याचे समजते. घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली.

Web Title: Laborer killed in Shahapur Kolhapur district, body dumped in stream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.