मजूर संघ पुन्हा शाहू पॅनेलकडे

By admin | Published: September 24, 2015 12:31 AM2015-09-24T00:31:32+5:302015-09-24T00:33:05+5:30

मुकुंद पोवार गटाचा धुव्वा : सर्वच्या सर्व १५ जागा मोठ्या फरकाने विजयी

Laborer team again to Shahu panel | मजूर संघ पुन्हा शाहू पॅनेलकडे

मजूर संघ पुन्हा शाहू पॅनेलकडे

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या निवडणुकीत उदय जोशी, भीमराव नलवडे व आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत निर्विवाद संघावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी मुकुंद पोवार यांच्या नेतृत्वाखालील महालक्ष्मी मजूर सहकार पॅनेलचा धुव्वा उडाला.
मतदार यादीवरून हे प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचल्याने संघर्ष शिगेला पोहोचला होता.
सकाळी आठपासून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात मतदानास सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत ३२७ पैकी ३०० मतदान झाले होते. दुपारी चारपर्यंत १०० टक्के मतदान झाले. दुपारी साडे चारनंतर तिथेच मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच राजर्षी शाहू पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते. महालक्ष्मी पॅनेलचा एकही उमेदवार त्यांच्याजवळ फिरकू शकला नाही. १०० ते १२५ मतांच्या फरकाने शाहू पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निकालानंतर उदय जोशी यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णा ठाकरे यांनी काम पाहिले. दरम्यान, विजयी उमेदवारांनी प्रमाणपत्रांची मागणी केली; पण जिल्हा उपनिबंधकांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने दोन दिवसांत प्रमाणपत्रांचे वाटप करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पण, उमेदवारांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

विजयी उमेदवार कंसात मतदान
बाळासाहेब जकण्णावर (२०२), उदय जोशी (२०६), प्रवीण नलवडे (२०५) , भीमराव नलवडे (२०४), जयसिंंग पाटील (२०३), सविता पाटील (२०९), सम्राटसिंह पाटील (२०८), संभाजी पाटील २०५), चंद्रकांत सुतार (२०२), महादेव सांगळे (१९८).
अनुसूचित जाती - शंकर कांबळे (२११)
भटक्या विमुक्त जाती - तानाजी पोवार (२०५)
इतर मागासवर्गीय - विजय गुरव (२१६)
महिला प्रतिनिधी - शारदा शरद करंबे (२१८), रंजना आप्पासो पाटील (२११).

पोवार पिता-पुत्रांचा पराभव
मुकुंद पोवार यांचा सर्वसाधारण व भटक्या विमुक्त जाती गटातून पराभव झाला. पोवार यांना स्वत:सह सुपुत्र प्रमोद पोवार यांचाही पराभव रोखता आला नाही.

श्री महालक्ष्मी मजूर सहकार पॅनेल (पराभूत)-
सर्वसाधारण गट - प्रकाश गोसावी (१०४), लक्ष्मण धोतरे (१०६), तुकाराम पाटील (१०६), महादेव पाटील (१०५), रावसो पाटील (१०४), विलास पाटील (१०५), प्रमोद पोवार (११६), मुकुंद पोवार (११८), तानाजी महाजन (१०९), बयाजी शेळके (११०). अनुसूचित जाती/जमाती - सुभाष देसाई (११६). भटक्या विमुक्त जाती/जमाती - मुकुंद पोवार (१२१). इतर मागासवर्गीय - विजय सुतार (१११). महिला प्रतिनिधी - शारदा पोवार (११९)

एकाधिकारशाही, भ्रष्टाचाराच्या सम्राटाला सभासदांच्या साथीने उधळून टाकले. आगामी काळात मजूर संघाचा कारभार स्वच्छ करून संघ राज्यात अग्रेसर बनवू.
- उदय जोशी
(प्रमुख राजर्षी शाहू पॅनेल)

सभासदांचा कौल मान्य आहे. उदय जोशी यांना शुभेच्छा. भाड्याच्या जागेतून स्वमालकीच्या इमारती संघाचे कार्यालय आम्ही नेले, ते त्यांनी चांगले चालवावे.
- मुकुंद पोवार
(प्रमुख श्री महालक्ष्मी मजूर पॅनेल)

Web Title: Laborer team again to Shahu panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.