हुपरी आरोग्य केंद्रात सुविधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:20+5:302021-03-13T04:45:20+5:30

निवेदनात म्हटले आहे, हुपरीसह परिसरातील रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी गावातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जाते. आरोग्य केंद्रासाठी मुख्य दवाखाना इमारत, ...

Lack of facilities at Hupari Health Center | हुपरी आरोग्य केंद्रात सुविधांचा तुटवडा

हुपरी आरोग्य केंद्रात सुविधांचा तुटवडा

Next

निवेदनात म्हटले आहे, हुपरीसह परिसरातील रेंदाळ, यळगूड, रांगोळी, जंगमवाडी गावातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविली जाते. आरोग्य केंद्रासाठी मुख्य दवाखाना इमारत, ऑपरेशन थिएटर, लॅब, एम. ओ. क्वार्टर व नर्सिंग स्टाफसाठी सहा क्वॉर्टर इमारतींची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रात लागणाऱ्या वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांना, नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांना रुग्णांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहे. परिणामी साहित्यांच्या उपलब्धतेअभावी गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवावे लागत आहे तसेच आरोग्य केंद्राच्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना येथे राहण्यास अडचणी येत आहेत. आवश्यक त्या साहित्यांचा पुरवठा करून इमारतीची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती पाटील यांच्याकडे केली आहे. शिष्टमंडळात राजेंद्र पाटील, अमोल देशपांडे, महेश कोरवी, संजय चौगुले, उषा चौगुले, मीना जाधव आदींचा सहभाग होता.

फोटो ओळी -हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांची हेळसांड थांबवावी, या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांना दिले. यावेळी राजेंद्र पाटील, अमोल देशपांडे, महेश कोरवी, संजय चौगुले, उषा चौगुले, मीना जाधव आदी उपस्थित होते.

१२ हुपरी शिवसेना निवेदन

Web Title: Lack of facilities at Hupari Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.